Dombivli railway station viral video: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो लोक नोकरी, धंदा, शिक्षणासाठी मुंबई लोकलने प्रवास करतात. मुंबई लोकल ठप्प झाली की, मुंबईचे आर्थिक गणित बिघडते. पण, मुंबई लोकलने प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा चांगले-वाईट अनुभव येत असतात. नेहमी गर्दीमुळे चर्चेत असणारी मुंबई लोकल हल्ली मात्र अनेक धक्कादायक, विचित्र घटनांमुळे चर्चेत असते. सध्या मुंबई लोकलमधील अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पोलिस आणि इतर रेल्वेची यंत्रणा सुध्दा खडबडून जागी झाली आहे. एक तरुण डोबिंवली रेल्वे स्टेशनवरुन सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करीत असताना ‘ड्रग्ज’ची नशा करीत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून लोकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी असा नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.

पैशाची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण समाजकंटकासारखे वागत आहेत. कमीत कमी श्रमात मिळणारे जास्त पैसे, सहज मिळणारे व्यसनांचे साहित्य, पालकांचे दुर्लक्ष, पोलिसांचेही अवैध धंद्यांना असलेले अभय, इत्यादी कारणांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. ही किशोरवयीन मुले गांजा, व्हाइटनर तर काहीजण अक्षरशः पेट्रोलची नशा करताना दिसून येत आहेत. तर आता थेट लोकलमध्ये ही मुलं नशा करताना दिसली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण लोकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नशा करत आहे. त्याच्याकडे नशेचं वेगवेगळ साहित्य दिसत आहे. डोंबिवली सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये दुपारच्या वेळेस खुलेआम गर्दुल्ल्यांचा वावर वाढत असल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

व्यसनाच्या आहारी गेलेली ही अल्पवयीन तरुणाई तहान भूक विसरून भटकताना दिसते. कधी निवांतपणे एखाद्या इमारतीच्या गॅलरीत, कधी झाडाखाली, मोकळ्या मैदानावर ते उपाशीपोटी झोपलेले दिसतात. यावेळी पालकांनी आपला मुलगा कोठे गेला, त्याचे मित्र कोण, दिलेल्या पैशाचा वापर कशासाठी करतो, घरातून पैसे तर लंपास होत नाही ना, मोबाईल किंवा सायकल चोरी गेली असे सांगुन व्यसन तर करत नाही ना, घरातून आठ दहा तास जातो तरी कोठे, जेवण न करता झोपी का जातो, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.