Drug Sell Via Emojis WhatsApp Chats: पुणे शहर पोलिसांनी मागील काही दिवसात विविध ठिकाणी अनेक अमली पदार्थ जप्त केले होते. यातील संबंधित गुन्हेगार हे मुख्यतः तरुण वर्गातील असल्याचे समजतेय आणि ड्रग्सच्या तस्करीसाठी ही मंडळी चॅट्समध्ये विशिष्ट ईमोजीचा वापर करत असल्याचे सुद्धा आढळून आले. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी तरुण मुलांच्या पालकांना सतर्क करण्यासाठी अशा ईमोजी व त्यांच्या अर्थाची माहिती देणारे एक ट्वीट केले आहे. यानुसार पालकांनाही आपल्या मुलांच्या संभाषणांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या वर्षी 1 जानेवारीपासून पुणे शहर पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या ५८ प्रकरणांमध्ये गांजा किंवा गांजा, मेफेड्रोन, कोकेन, चरस, खसखस, अफू, कॅथा एड्युलिस किंवा खात, MDMA ज्याला एक्स्टसी, ब्राऊन शुगर, मॅजिक मशरूम असेही म्हणतात, चरस तेल आणि एलएसडी यांचा समावेश होता. तब्बल ७.२८ कोटी रुपयांचे हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये तब्बल ८२ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

cyber crime
सायबर गुन्हेगारांकडून खरेदीसाठी आमिष दाखवून फसवणूक
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Mayni Medical College , Financial Misappropriation Mayni Medical College,
मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : दीपक देशमुख यांची अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटकेचे आदेश
Diwali cleaning, home, theft, house, crime news, mumbai
मुंबई : दिवाळीनिमित्त घरात केलेली साफसफाई पडली महागात, कशी ते वाचा आणि सावध व्हा
fda meswak
मुंबई: मेसवाक दंतमंजनवर एफडीएची कारवाई, ४१ लाख रुपयांचा साठा जप्त
cocaine pizza germany
कोकेन पिझ्झा तुम्हाला माहितेय का? काय आहे नेमकं प्रकरण? का झाली कारवाई?
Rajasthan gang arrested for deceiving couriers with drugs
पिंपरी : कुरीअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून फसवणार्‍या राजस्थानच्या टोळीचा पर्दाफाश; पाऊणकोटीचा मुद्देमाल जप्त
medical examinations, J J Hospital Mumbai, Report of Committee,
रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासण्या उपलब्ध नसल्यास कारवाई अयोग्य, जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांवरील आरोपाबाबात समितीचा अहवाल

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलचे निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे, ड्रग्जच्या खरेदी- विक्रीसाठी थेट मोबाइलवरूनच संपर्क केले जात होते तसेच यासाठी चॅट्समध्ये विशिष्ट ईमोजी सुद्धा वापरले जात असल्याचे लक्षात आले.

आतापर्यंत नोंदवलेल्या अमली पदार्थांच्या जप्तीच्या ५८ प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी काय जप्त केले?

  • ७७.३८ लाख रुपये किमतीचा 385 किलोग्राम गांजा,
  • ३.७ कोटी रुपये किमतीचा १.८ किलोग्रॅम मेफेड्रोन,
  • ५,८३,००० हजार रुपये किमतीचा कोकेन
  • ४२.६८ लाख रुपये किमतीचे चरस
  • ७६,००० रुपये किमतीचे ५ किलोग्रॅम खसखस,
  • ८.३४ लाख रुपये किमतीचे ४१७ ग्रॅम अफू,
  • ७ लाख रुपये किमतीचे खातच्या पानांचे कॅथा एड्युलिस आणि पावडर,
  • १.६ कोटी रुपये किमतीचे एलएसडी स्टॅम्प.
  • १.७ लाख रुपयांच्या एक्स्टसी गोळ्या
  • ४०.३३ लाख रुपये किमतीचे ३३६ ग्रॅम ब्राऊन शुगर
  • १ लाख रुपये किमतीचे सायलोसायबिन मशरूम किंवा मॅजिक मशरूम
  • ३.९ लाख रुपये किमतीचे २९ ग्रॅम चरस तेल.

ड्रॅग तस्करीसाठी ‘या’ इमोजीचा केला गेला वापर

UNODC च्या वेबसाइटनुसार, अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस, किंवा जागतिक ड्रग डे, २६ जून रोजी साजरा केला जातो. याच दिनानिमित्त पुणे पोलिसांनी हाती घेतलेल्या विविध जागरूकता उपक्रमांचा भाग म्हणून सुद्धा हे ट्वीट करण्यात आले आहे.