Woman Strips Naked On Airport:  अमली पदार्थाचे सेवन करून एका महिलेने विमानतळावर धिंगाणा घातल्याच्या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जमैकामधील किंग्स्टन विमानतळावर ही घटना घडली. या घटनेच्या व्हिडीओत एक महिला नशेमध्ये अंगावरील कपडे काढून जोरजोरात ओरडताना दिसत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे नग्नावस्थेत ही महिला भरविमानतळावर शरीरसंबंधाची मागणी करताना दिसतेय. भरविमानतळावर सुरू असलेला महिलेचा हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहून लोकही अवाक् झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांशी असभ्य वर्तनाचा प्रयत्न

या नशेत धुंद झालेल्या महिलेने विमानतळावर पोहोचताच आपल्या बॅग आणि सर्व गोष्टी बाजूला फेकत अंगावरील कपडे काढून टाकले. त्यानंतर तिने जोरजोरात ओरडत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. विमानतळावर हा सर्व प्रकार घडताना संबंधित महिलेला रोखण्यासाठी एक पोलीस कर्मचारी पुढे आला. त्यावेळी महिलेने त्याला जवळ ओढण्याचा प्रयत्न करीत ती जोरजोरात ओरडू लागली. इतकेच नव्हे, तर त्याच्याबरोबर ती असभ्य वर्तनाचा प्रयत्न करताना दिसत आहे. या महिलेला रोखण्यासाठी पुढे येणाऱ्या लोकांवर ती ओरडून, त्यांना हाताला मिळेत ते फेकून मारू लागली. या घटनेमुळे विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

किंचाळत शरीरसंबंधाची मागणी

या महिलेला शांत करण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले; मात्र बराच वेळ महिला कोणाचेही न ऐकता मोठमोठ्याने किंचाळत होती. महिला तिच्या गुप्तांगाला स्पर्श करीत वारंवार शरीरसंबंधाची मागणी करीत होती. यावेळी ती सुरक्षा रक्षकांच्या अंगावर धावून, त्यांच्याशी असभ्य वर्तन करीत होती. महिलेचा हा धक्कादायक अवतार पाहून कर्मचारीही मागे हटला. यावेळी त्या महिलेला एका पुरुषाने सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही ती जोरजोरात ओरडू लागली.

अखेर एका महिला सुरक्षा अधिकाऱ्याने पुढाकार घेत महिलेला जमिनीवर पाडून, तिला बेड्या ठोकल्या. त्यानंतरही ती महिला झटापट करीत राहिली. या झटापटीत ती महिला जमिनीवर पडली. ती महिला नग्नावस्थेत गोंधळ घालत असताना इतर महिला तिच्या अंगावर कपडे टाकून तिचे अंग झाकण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र, ती महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

हा सारा धक्कादायक प्रकार पाहून विमानतळावरील उपस्थित कर्मचारी आणि प्रवासीही स्तब्ध झाले. या घटनेबाबतचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही; पण हा व्हिडीओ १४ एप्रिलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून, मोठ्या संख्येने सोशल मीडिया युजर्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drugged woman high voltage drama caught on camera strips naked demands sex at jamaica airport video viral sjr