महिलांच्या सुरक्षेबाबत देशभरात चिंतेचे वातावरण आहे. अशात एका रिक्षाचालकाने राईड कॅन्सल केल्याच्या रागात भररस्त्यात तरुणीबरोबर गैरवर्तन केल्याचा धक्कादाय प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता आणखी वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मद्यधुंद रिक्षा चालकाने एका महिलेच्या दुचाकीला धडक दिली होती, दरम्यान या प्रकरणात जेव्हा वाहतूक पोलिस कॉन्सटेबलने हस्तक्षेप केला तेव्हा रिक्षाचालकाने ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मद्यधुंद रिक्षाचालकांची मनमानी

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, “शुक्रवार, ७ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये दोन ऑटोरिक्षा चालक वाहतूक पोलिस कॉन्सटेबलसह भांडताना दिसत आहे तर ऑटोरिक्षा चालकांनी ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिस कॉन्सटेबलला मारहाण केली. या घटने बाबत वाहतूक पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक एका महिलेला त्रास देत होते आणि त्यांनी त्यांची ऑटोरिक्षा रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले होते.”

तर स्थानिकांनी दावा केला की, एका मद्यधुंद रिक्षा चालकाने एका महिलेच्या दुचाकीला धडक दिली होती, ज्यामुळे वाहतूक पोलिस कॉन्सटेबलने रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी हस्तक्षेप केला. पोलिस संध्याकाळी उशिरा ऑटो-रिक्षा चालकांबद्दल तक्रार नोंदवण्यास जात असताना, रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिस कॉन्सटेबलविरूद्ध क्रॉस-कंपलेंट दाखल करण्याची मागणी केली.

हेही वाचा – लाडक्या बाप्पासाठी चिमुकल्याने गायले “आमच्या पप्पांनी गणपती आणला”गाणे, गोंडस हावभाव बघून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू, पाहा Viral Video

या घटनेचा व्हिडिओ एक्सवर Ghar ke kalesh नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे.

व्हिडिओमध्ये रिक्षाचालक वाहतूक पोलिस कॉन्सटेबलबरोबर गैरवर्तन करताना दिसत आहे. काही वेळातच दुसरा रिक्षा चालका या भांडणात सामील झाला आणि दोन्ही चालकांनी वा वाहतूक पोलिस कॉन्सटेबलला मारहाण केली. यावेळी एका रिक्षाचालकाने कॉन्स्टेबलला चापट मारली. त्याला धक्काबुक्की करत जमिनीवर ढकलून दिले. दरम्यान वाहतूक पोलिस कॉनस्टेबला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकांच्या तावडीतून सोडवण्यासाठी दुसरा वाहतूक पोलिस अधिकारी तेथे आले. सर्व घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान वाहतूक पोलिस कॉनस्टेबला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकांच्या तावडीतून सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस अधिकारी तेथे आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तक्रार दाखल करून एका ऑटोरिक्षा चालकाला फौजदारी गुन्ह्यासाठी ताब्यात घेतले आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी रिक्षा चालकांच्या कृत्यावर रोष व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली. एकाने लिहिले की,”DGPMaharashtra @CMOMaharashtra कृपया यांच्या विरोधात कडक कारवाई करावी.”

हेही वाचा – “उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी

दुसर्‍याने लिहिले की, “कोणाचीही चुकी असली तर या प्रकरणावर त्वरित कारवाई केली पाहिजे.”

तिसऱ्याने लिहिले की, “रिक्षाचालकांची आजकाल मनमानी सुरु आहे. वाहतूक पोलिसांना देखील मारत आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk auto drivers assault traffic guard in thane video goes viral snk