दारू पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. असे असूनही काही लोक रात्रंदिवस नशा करताना दिसतात. त्याच वेळी मद्यपान करून वाहन चालविणे हा दंडनीय गुन्हा आहे. पण, नियमाचे पालन कोण करतो? दारूच्या नशेत ड्रायव्हरने दुसऱ्याच्या गाडीला धडक दिल्याची किंवा कुणाचा जीव घेतल्याची अशी प्रकरणे रोजच वाचायला वा ऐकायला मिळतात. देशात ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या घटना वाढत असून, त्यात अनेक जण जखमी होतात वा निरपराधांचे नाहक जीव जातात. आता असाच एक ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दारूच्या नशेत अनेक दुर्घटना झाल्याचे आपण ऐकले असेल. अनेकदा मद्यपान केल्यानंतर गाडी चालविण्यामुळे अपघात झाले आहेत. अशातच अनेकांनी आपला जीवसुद्धा गमावला आहे. छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बालोद येथील गंजपारा भागात कारचालकाने समोरून येणाऱ्या स्कूटरला धडक दिली. त्या धडकेमुळे स्कूटरसह तरुणी काही फूट दूर जाऊन रस्त्यावर पडली. अपघाताच्या वेळी कारचालक दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. तो इतका नशेत होता की, त्याला त्याचे नावही सांगता येत नव्हते. पादचाऱ्यांनी मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले.

(हे ही वाचा : म्हशींच्या कळपाने केला सिंहाचा मोठा गेम; वाचण्यासाठी बसला झाडावर, म्हशींनी असं काय केलं? पाहा Video)

दारूच्या नशेत असलेल्या कारचालकाला पोलिसांनी अटक केली असून, त्याची अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा व्हिडीओ शेअर करून, लोकांना अपघाताबाबत जागरूक राहावे, असे आवाहनही केले जात असताना दिसत आहे.

एप्रिलमध्ये राजधानी रांचीमध्ये असाच एक अपघात समोर आला होता. जिथे एका अनियंत्रित कारने पाच जणांना चिरडले होते. त्यामध्ये जलसंपदा विभागाच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी आरोपी कारचालक दारूच्या नशेत होता आणि तो फरारी झाला होता. पोलिसांनी त्याच्या एका मित्राला अटक करून, कार जप्त केली आहे. नंतर आरोपीही पकडला गेला.

येथे पाहा व्हिडीओ

थारचालकाने दोघांना चिरडले

त्याच वेळी दोन महिन्यांपूर्वी रांचीच्या लालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करमटोली चौकाजवळ भरधाव असलेल्या थारने स्कूटरवरून जाणाऱ्या दोन तरुणांना चिरडले होते. या थारमध्ये दोन तरुण आणि एक मुलगी होते, त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. हे प्रकरण लुटमारीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. २७ वर्षीय कांडी रहिवासी अनुज कुमार आणि २५ वर्षीय अंकुश यांच्या मृत्यूची पोलिसांनी पुष्टी केली आहे. त्यांच्या ओळखपत्रांवरून या तरुणांची ओळख पटली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk car driver drags scooty for several kilometers horrifying video of accident goes viral pdb
Show comments