Drunk Employee Messages His Boss At 2 AM Chatting Goes Viral : कार्यालयात नोकरी करताना कर्मचाऱ्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अचानक सुट्टी घ्यायची असेल किंवा एमरजन्सी काम असेल तर कर्मचाऱ्यांना बॉसची परवानगी घ्यावी लागते. पण आता एका कर्मचाऱ्याने बॉसला भन्नाट मेसेज केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. दोघांमधील मजेशीर चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. कर्मचाऱ्याने चक्क दारु प्यायल्याचा मेसेज रात्री २ वाजता त्याच्या बॉसला केला अन् त्यानंतरॉ मॅनेजरनंही भन्नाट रिप्लाय देत स्क्रिनशॉट व्हायरल केला.
व्हायरल चॅटिंगमध्ये पाहू शकता की, दारु पिणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याच्या मनातील भावना बॉसकडे व्यक्त केल्या. कामात विश्वास ठेवल्याबद्दल आणि पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल कर्मचाऱ्याने बॉसचं आभार मानलं आहेत. कर्मचाऱ्यानेही प्रामाणिकपणा दाखवून बॉसचा विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचाऱ्याने मेसेज करत म्हटलं, “बॉस मी दारु प्यायलो आहे. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. मला नेहमी मार्गदर्शन केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. एका कंपनीपेक्षा चांगला व्यवस्थापर मिळणे खूप कठीण असतं. पण मी नशिबवान आहे. म्हणून तुमचं कौतुक होणं अपेक्षित आहे.”
नक्की वाचा – Optical Illusion: या चित्रात कोणता प्राणी दिसतोय? बैल की हत्ती? क्लिक करुन नीट बघा
इथे पाहा कर्मचाऱ्याने बॉसला केलेला भन्नाट मेसेज
या चॅटिंगचा स्क्रिनशॉट व्हायरल करत बॉसने म्हटलं, दारु प्यायल्याचा मेसेज येणे ठिक आहे. तुम्हाला अशाप्रकारचे मेसेज कधी आले आहेत का? असं कॅप्शन देत सिद्धांत नावाच्या मॅनेजरने यूजर्सला प्रश्न विचारला आहे. हा पोस्ट व्हायरल होताच तमाम नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिला आहे. सिद्धांतने दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. सिद्धांतने सीव्हीमध्ये हे चॅटिंग दाखवायला पाहिजे, असंही काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं. या व्हायरल पोस्टला नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावर केला आहे. ट्वीटरवर दिलेल्या भन्नाट प्रतिक्रिया तुम्ही खाली स्क्रोल करून वाचू शकता.