नाशिक शहराला धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते पण येथे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारी तरुणाई नशेत बुडत चालल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. मद्यधुंद तरुणीने पोलि‍सांनी अडवल्यानंतर भररस्त्यात राडा घाला आहे. पोलीसांशी हुज्जत घालणार्‍या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणीचा दार पिऊन रस्त्यावर राडा

मद्यधुंद तरुणीला पोलि‍सांनी अडवल्यानंतर त्यांच्याशी वाद घालताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते की, व्हिडिओ शूट करणाऱ्याला तरुणी विचारते की,”व्हिडिओ का काढत आहे?” त्यावर व्हिडिओ शुट करणारी व्यक्ती उद्धटपणे उत्तर दे की, “तुझ्या बापाचा आहे का?” ती त्याला व्हिडिओ बंद कर म्हणत तेथून निघून जाते. त्यानंतर तरुणी मद्यधुंद अवस्थेत प्रियकराला गाडी काढून तेथून जाण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर पोलिस त्यांच्या गाडी बंद करण्यास सांगतात त्यावर तरुणी विचारते,”गाडी का बंद करायची? त्यानंतर व्हिडिओ शुट करणाऱ्याचा आवाज ऐकू येतो ज्यामध्ये तो तिच्या प्रियकरला म्हणतो की,”तिला सांग बरं का, लय जड जाईल तुम्हाला हे” असे म्हणतो. त्यानंतर प्रियकर शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

पोलिस गाडीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यावर ती तरुणी म्हणते, “गाडी आमची आहे, तुम्ही आमच्या गाडीची चावी नाही घेऊ शकत? इथे महिला पोलिस नाहीये, गाडी काढ येथून. तुम्ही आम्हाला असे पकडू शकत नाही आम्ही काही केले नाही.” त्यानंतर व्हिडिओ शुट करणाऱ्या व्यक्तीचा आवाज येतो जो म्हणतो की, “महिला पोलिसांना बोलवून घ्या.” पोलिस गाडीची चावी काढून घेतात त्यानंतर तरुणी गाडीची चावी द्या म्हणत त्यांच्या मागे जाते. त्यानंतर तिचा प्रियकर तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण ती काहीच ऐकत नाही आणि पुन्हा पोलिसांकडे जाऊन म्हणते, “व्हिडिओ करण्याचे काही कारण नाहीये. आम्ही तुम्हाला काही करत नाहीये, आम्ही दूर थांबलो आहोत. आम्ही नशेत आहोत, आम्ही दारू पिऊन आलो आहोत, तुम्हाला काय त्रास होतोय.” तिचा प्रियकर तिला शांत करत बाजूला घेऊन जातो.

येथे पाहा Video

नक्की चूक कोणाची? नेटकऱ्यांमध्ये पेटला वाद

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर shahaanpana.in नावाच्या पेजवरही व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. काहींनी पोलिस पैस उकळण्यासाठी त्रास देत आहे असा आरोप केला तर काहींनी मद्यधुंद तरुणीवर टिका केली.

एकाने कमेंट केली की, जर बार व क्लब वेळेत बंद केले तर ही वेळ येणार नाही. सामान्य जनतेला दादागिरी दाखवण्यापेक्षा बारवाल्यांना व क्लबवाल्यांना दादागिरी दाखवा.”

दुसऱ्याने कमेंट केली की,”हे असले बाहेरून महाराष्ट्रात शिकायला आलेले.. बदनामी करत आहेत”

तिसऱ्याने कमेंट केली की, दारू ची दुकान बंद करायचा दम नाही सामान्य जनतेला त्रास देतात

चौथ्याने म्हटले की, मुलीची पण चूक आहे. प्रशासानाने पण थोडी नरमाईने घ्यायला पाहिजे. मुलगा आदराने बोलत आहे. ती महिला आहे आणि तिथे महिला पोलिस नाही. त्यांना समज देऊन दुसऱ्या दिवशी बोलवले पाहिजे. रात्रीची वेळ आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk girl gets into an argument with the police watch the viral video who is wrong nashik snk