Drunk Man Driving Car On Railway Track : रेल्वे ट्रॅकजवळ गेल्यावर जीवाला धोका निर्माण होतो, हे सर्वांनाच माहित आहे. रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न केल्यावर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं. परंतु, केरळच्या एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण एका पठ्ठ्याने दारु पिऊन रेल्वे ट्रॅकवर कार चालवण्याचा प्रयत्न केला. जयप्रकाश असं या व्यक्तीचं नाव असून तो अंजराकॅंडी येथील रहिवासी आहे. हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताच कन्नूर पोलिसांनी रेल्वे कायद्यांनुसार कारवाई करत त्या आरोपीला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याबाबत सविस्तर वृत्त असं की, आरोपी जयप्रकाशने दारू पिऊन रेल्वे ट्रॅकवर कार चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याची कार रेल्वे ट्रॅकच्या मधोमध अडकली. सुदैवाने त्यावेळी कोणतीही ट्रेन या रेल्वे रुळावरून धावत नव्हती. परंतु, स्थानिक लोकांनी या व्यक्तीचा व्हिडीओ शूट केला. ही घटना थाझे छोव्वा रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. जयप्रकाश दारुच्या नशेत असल्याने त्याला कार कुठे थांबली आहे, याबद्दल काहीच समजत नव्हतं. कारण तो गिअर चेंज करुन कार बाजूच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – सावधान! पावसाळ्यात दुचाकी चालवताय? २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, अपघाताचा ‘हा’ व्हिडीओ एकदा बघाच

इथे पाहा व्हिडीओ

रिपोर्टनुसार, त्याने रेल्वे ट्रॅकवर जवळपास १५ मीटरपर्यंत कार चालवली. परंतु, त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला पाहिलं आणि झालेली संपूर्ण घटना कॅमेरात कैद केली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर जामीन मिळाल्यावर त्याची सुटका करण्यात आली.