Drunk Man Enters Lions Cage Video: दारू प्यायल्यावर एक भलताच आत्मविश्वास माणसाच्या डोक्यात भरतो हे आपण अनेकदा ऐकलं, वाचलं अगदी पाहिलं सुद्धा असेल. दारू पिऊन उगाच एखाद्याशी पंगा घेणं, वेगाने गाडी चालवणं, भररस्त्यात तमाशे करणं हे तात्पुरतं जरी गौरवाचं वाटत असलं तरी नशा उतरल्यावर अनेकदा पश्चाताप करावा लागतो. आता जोपर्यंत पश्चातापच करायची वेळ येतेय तोपर्यंत ठीक पण काही वेळा अतिउत्साहात केलेल्या पराक्रमामुळे जीव सुद्धा गमावून बसावा लागू शकतो. असाच अतिआत्मविश्वासू मद्यपी एका सिंहाच्या पिंजऱ्यात शिरल्याची घटना सध्या समोर येत आहे. भारतीय वन्याधिकारी सुशांत नंदा यांनी या घटनेचा व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.
अतिउत्साह, दारूच्या नशेत धुंद असणारा एक तरुण थेट सिंहाच्या पिंजऱ्यात शिरला. त्याचा हा मूर्खपणा पाहून सिंह सुद्धा चक्रावून गेला होता. सिंहाला कळतच नव्हतं की याच्या मूर्खपणाकडे लक्ष द्यावं की दारूच्या भपक्याकडे? अशा आशयाचे कॅप्शन लिहून IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. दीड मिनिटांचा हा व्हिडीओ पाहताना तुमच्या लक्षात येईल की आपल्याच पायावर आपणच धोंडा मारून घेणे ही म्हण खऱ्या आयुष्यात कशी दिसू शकते. सुरुवातीला संभ्रमात असणारा सिंह जेव्हा खवळतो तो क्षण तर चुकूनही मिस करू नका.
Video: सिंहाच्या पिंजऱ्यात शिरला दारुड्या आणि मग…
हे ही वाचा << “ही गर्दी हिंदूंच्या घरात घुसली तर…”, भडकवणाऱ्या सूचनेसह प्रचंड शेअर होतोय मुस्लिम मोर्चा, नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकाऱ्यांनी व्हिडिओमधील दारुड्यावर प्रचंड टीका केली आहे. खरंतर सिंह हा राजा आहे आणि तो अशा लोकांचं तोंडी लागणारच नाही असेही काहीजण म्हणत आहेत. तर हा माणूस जिवंत आहे का असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. जंगलात हा तरुण दारू प्यायला कशाला गेला होता आणि अचानक इथे सिंह कसा काय आला, व्हिडिओमध्ये अन्य कोणीच कसं दिसत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडीओ शूट करणार्याने त्या माणसाला थांबवले का नाही असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. तुम्हाला याचं उत्तर देता येईल का? कमेंटमध्ये कळवा.