सोशल मिडियावर रोज काहीना काही व्हायरल होत असतं. काही व्हिडीओ विचार करायला भाग पडतात तर काही व्हिडीओमुळे पोट दुखेपर्यंत हसायला येत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. एक मद्यधुंद माणूस विमानतळाच्या कॅरोसेल नेटवर्कमध्ये त्याच्या विमानात जाण्याचा प्रयत्न करत असताना हरवला. ही घटना रशियात घडली आहे. २८ जुलै रोजी मॉस्कोच्या शेरेमेटेवो आंतरराष्ट्रीय विमानतळावरावरील घटनेचे हे फुटेज व्हायरल झाले आहे. ‘बझ वॉच’ या युट्युब चॅनेलने हा व्हीडीओ प्रसारित आहे. याला आत्तापर्यंत जवळ जवळ ५० हजार लोकांनी बघितलं आहे. अनेकांनी कमेंटही केली आहे.

नक्की काय झालं?

रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, तो माणूस सामान कॅरोसेलद्वारे धावपट्टीवर पोहोचण्याचा प्रयत्न करीत होता. पण तो त्या मार्गातच हरवला आणि विमानतळाच्या पडद्यामागे असलेल्या कन्व्हेयर बेल्टवर पोहचला. व्हीडीओ क्लिप दर्शविते की माणूस चुकीच्या मार्गाने कन्व्हेयर बेल्टकडे वळण्यापूर्वी त्याच्या सामानासह कॅरोसेलमध्ये चालत आहे. पाय अडकून तो पडतो. अनपेक्षित कन्व्हेयर बेल्टवर जातो जेव्हा त्याची बॅग एका रेलिंगवर अडकते. त्याने ती काढायचा प्रयत्न करताच त्याला एका कॅरोसेलने खाली उतरले जाते. सरतेशेवटी, तो बॅगेज स्क्रीनिंग गेटवर पोहोचतो, जिथे सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतात.

या आधीही अशीच एक घटना घडली होती

गेल्या वर्षी, लास वेगास विमानतळावर एका व्यक्तीला अलास्का एअरलाइन्सच्या विमानाच्या विंगवर चढण्यापूर्वी अटक करण्यात आली होती. लास वेगासहून पोर्टलँडला जाणारे विमान मॅककेरन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करण्याच्या तयारीत असताना पायलटने त्या माणसाला येताना पाहिले. विमानाच्या दिशेने आणि नियंत्रण टॉवरला सूचित केले, असे विमान कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

या माणसाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.