Drunk Man Pets Cobra Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा सापाचे व्हिडिओ समोर येत असतात. अनेकदा सर्पमित्र साप पकडताना दिसतात. सापबद्दल फारके माहित नसताना त्यांच्या जवळ जाऊ नये असे नेहमी सर्पमित्र सांगतात. साप कधी दंश करेल याचा कोणालाही लावता येत नाही तरी काही लोक सापांची खोड काढायला जातात. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद व्यक्ती थेट विषारी सापाबरोबर गप्पा मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे तो सापाबरोबर त्याचा पाळीव प्राणी असल्यासारखा वागत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.
एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांना भयभीत केले आहे आणि उत्सुकता निर्माण केली आहे. एक व्यक्ती दारूच्या नशेत असताना काहीही करू शकतो हे दर्शवणारा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सापाला कुरवाळतोय हा व्यक्ती
व्हिडिओ पाहून असे वाटते की, व्हिडीओमध्ये पाहू शकता हातात दारूची बाटली घेऊन एका झाडाखाली बसलेला एक व्यक्ती बसला आबे. या मद्यधुंद व्यक्तीने चक्क विषारी सापाला पाळले आहे. कारण पाळीव प्राण्याबरोबर गप्पा माराव्या तसा तो सापाबरोबर गप्पा मारत बसला आहे. एवढंच नाही तर तो सापाच्या चक्क प्रेमाने कुरवाळत आहे आणि त्याची शेपटी देखील पकडतो. हे दृश्य पाहून नेटकऱ्यांच्या भितीने काटा उभा राहिला आहे कारण तो साप कधीही त्या व्यक्तीला चावू शकतो. सुदैवाने असे काही घडले नाही. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहे. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इंस्टाग्रामवर a2z_venkatपेजवर शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १०.२ दशलक्षाहून अधिक व्ह्यज मिळाले आहेत आणि नेटकऱ्यांनी कमेटही केल्या आहेत.
नेटकऱ्यांनी कमेंट करत व्यक्त केले आश्चर्य
या विलक्षण व्हिडिओने केवळ प्रेक्षकांनाच धक्का दिला आणि व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडला आहे. एक जण म्हणाला, “मी आजवर पाहिलेली ही सर्वात अवास्तव गोष्ट आहे. तो चित्रपटात आहे असे त्याला वाटते का?” दुसरा व्यक्तीने विनोद केला, “तो एकतर कमालीचा धाडसी आहे किंवा आश्चर्यकारकपणे नशेत आहे. कोणत्याही प्रकारे, ही चांगली कल्पना नाही. ” तिसऱ्याने लिहिले की, “मला माणसाच्या मद्याच्या पातळीपेक्षा सापाचा संयम संपत आहे, याबद्दल जास्त काळजी वाटेल.”
अनेकांनी चिंता व्यक्त केली. एकाने, “धोकादायक वन्यजीव कसे हाताळायचे नाहीत याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कोब्रा कोणत्याही क्षणी दंश करू शकतो.” दुसऱ्याने म्हणाले, “साप गोंधळलेला दिसतो पण शांत दिसतो. मला आशा आहे की, यामुळे इतरांना असेच स्टंट वापरण्यास प्रोत्साहन मिळणार नाही.” अजून एक वापरकर्त्याने सांगितले की“अविश्वसनीय! कोब्रा किती शांत आहे हे आश्चर्यकारक आहे, परंतु वन्यजीवांशी संवाद साधण्याचा हा नक्कीच योग्य मार्ग नाही.”