गेल्या काही दिवसांपासून विमानामध्ये प्रवाशांकडून गैरवर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फ्लाइटमधील लघवी प्रकरण ते मारामारी आणि डान्सपर्यंतचे अनेक प्रकरणं समोर आली आहेत. कधी सामान गहाळ होतं तर कधी प्रवाशांमध्ये भांडणं. प्रवाशांच्या गैरप्रकाराच्या घटनांमध्ये तर दिवसेंदिवस अधिक वाढ होत चालली आहे. यामधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातच आता विमानात एका प्रवाशाचं लैंगिक शोषण झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेल्टा एअरलाइन्समध्ये हा प्रकार घडला आहे. यानंतर एकच गोंधळ उडाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विमानात केलं धक्कादायक कृत्य

झालं असं की, विमानातील एका प्रवाशाने फ्लाइट अटेंडंटची गळाभेट घेत जबरदस्ती किस केल्याचा आरोप केला आहे. तसंच कॅप्टनचा फूड ट्रे तोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. डेव्हिड एलन बर्क नावाचा प्रवासी मिनेसोटाहून अलास्काला जात होता. डेव्हिड हा बिझनेस फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत होता. फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असल्याने कोणत्याही प्रवाशाला दारू पिण्यास परवानगी आहे. दरम्यान, विमानाचे स्वतःचे काही नियम होते, ज्यामुळे त्याला जास्त दारू पिण्याची परवानगी नव्हती. उड्डाण दरम्यान, वृद्धांना जास्त दारू पिण्यास मनाई करण्यात आली, ज्यामुळे तो संतापला. यानंतर या वृद्धाने केबिन क्रूला आपले शिकार बनवले. वृद्धाने केबिन क्रूला थांबवले आणि त्याला बळजबरीने किस केलं इतकंच नाही तर त्यांचे कौतुकही केले.

हेही वाचा – Video viral: सातफेरे घेण्यापूर्वीच नवरदेवावर काळाचा घाला, छोटीशी चूक अन्…

त्यांनी टीसीला म्हटलं की, तू किती सुंदर आहेस. त्यावर फ्लाइट अटेंडंटने त्यांचे आभार मानले. यानंतर त्यांनी मी तुला किस करू शकतो का? अशी विचारणा केली. त्यावर प्लाइट अटेंडंटने नाही असं उत्तर दिलं. यानंतर डेविड यांनी ठीक आहे, गळ्यावर करतो असं सांगत त्याला जबरदस्ती पकडून किस केलं. या घटनेनंतर फ्लाइट अटेंडंट केबिन क्रू रूममध्ये गेला. विमान उतरल्यानंतर वैमानिकाने विमानतळावर घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपीची चौकशी केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk passenger grabbed and forcibly kissed male flight attendant srk
Show comments