Drunk UP Man Potato Theft Cops video: देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. उत्सव काळात पोलिसांवरही कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असते. वैयक्तिक कुटुंबाच्या आनंदाला मुरड घालत पोलीस कर्तव्य बजावत असतात. पण समाजात काही असेही लोक असतात जे पोलिसांना नको त्या कामात गुंतवून ठेवतात. उत्तर प्रदेशच्या हरदौई जिल्ह्यात एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. इमर्जन्सी कॉल असल्यामुळे पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गावात पोहोचल्यानंतर विजय वर्मा नावाच्या व्यक्तीने फोन केल्याचे लक्षात आले. सदर इसम तो नशेच्या अमलाखाली होता. फोन करण्याचे कारण विचारले असता विजय वर्माने घरात चोरी झाल्याचे सांगितले. मात्र त्याने सांगितलेला मुद्देमाल ऐकून पोलिसही चक्रावून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी विजय वर्माची चौकशी केली. या चौकशीदरम्यान वर्माने सांगितले की, त्याच्या घरातून पाव किलो बटाटे चोरी झाले आहेत. या चौकशीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजय वर्माचा व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. पोलिसांनी त्याला विचारले की, तू नशा केली आहेस का? यावर तो हो असे उत्तर देतो. मी मजूर माणूस आहे, त्यामुळे सायंकाळी थोडी घेतो, असेही तो म्हणतो.

पोलिसांनी चोरीबद्दल विचारल्यानंतर विजय वर्माने सांगितले की, मी कामावरून घरी येताना बटाटे विकत आणले होते. पण थोडे मद्य घेऊन मी जेव्हा स्वयंपाक करायला बसलो तेव्हा मी विकत आणलेले बटाटे घरात दिसले नाहीत. आता पोलिसांनीच चौकशी करून चोरी झालेला मुद्देमाल सापडून द्यावा, असेही वर्मा म्हणाला.

पोलिसांनी जेव्हा तो नशेत असल्याचे सांगितले, तेव्हा विजय वर्मा म्हणाला की, मी मद्य प्यायलो की नाही? हे महत्त्वाचे नसून माझ्या घरातून बटाटे चोरी झाले, हे महत्त्वाचे आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला पाहीजे. दिवाळीच्या दिवसात हा मजेशीर प्रसंग घडल्यामुळे सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.