Drunk Woman High Voltage Drama Video Viral : रस्त्यावरून येजा करताना किंवा कार पार्किंग करत असताना काही लोकांच्या डोक्यात अहंकाराची हवा शिरलेली असते. दारू पिऊन भररस्त्यात धिंगाणा घालून लोकांना आणि पोलिसांना नाहक त्रास देणाऱ्या लोकांचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. आताही अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बंगळुरुच्या चर्च स्ट्रीटवर एका तरुणीने दारु पिऊन हाय वोल्टेज ड्रामा केला. बेकायदेशीरपणे कार पार्किंग करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या तरुणीने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. तरुणीने हुल्लडबाजी करत रस्त्यावरच धिंगाणा घातल्याची घटना कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगळुरु शहरातील चर्च स्ट्रीटवर नाईट लाईफसाठी पब आणि नाईट क्लब सुरु असतात. त्यामुळे या परिसरात काही मद्यपी कायद्याचं उल्लंघन करत रस्त्यावर येऊन धिंगाणा घालत असतात. रविवारी एका तरुणीने दारु पिऊन कार पार्किंगच्या समस्येवरून पोलिसांशी बाचाबाची केली. बेकायदेशीरपणे पार्क करण्यात आलेलं वाहन योग्य ठिकाणी लावण्यासाठी पोलिसांनी त्या तरुणाला सांगितल.

नक्की वाचा – VIRAL VIDEO: औरंगाबादच्या AIMS रुग्णालयाजवळ राडा! डॉक्टर आणि पोलिसांवर जमावाने केला हल्ला, ३ जणांना अटक

इथे पाहा दारु पिऊन पोलिसांसमोर राडा करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ

मात्र, दारूच्या नशेत असलेल्या तरुणीने भररस्त्यातच हाय वोल्टेज ड्रामा सुरु केला. घटनास्थळी महिला पोलीस नसल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एका पोलिसाने त्या महिलेला रिक्षात बसवून घरी पाठवलं. दारु पिऊन टल्ली झालेल्या तरुणीला रिक्षात बसवण्यासाठी एका महिलेनं मदत केल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे. तरुणीचा हा भयंकर व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk woman high voltage drama in front of police on bengaluru church street video viral on twitter nss