आजकाल ऑनलाइन टॅक्सी बुक करून आपण कुठेही फिरायला जाऊ शकतो. आपल्यासाठी ही अतिशय सामान्य बाब झाली आहे. जवळच जायचे असेल किंवा लांब, लोक सहज ओला, उबर यासारख्या टॅक्सी सर्व्हिसचा वापर करतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे का, की एखादी व्यक्ती एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी टॅक्सी बुक करत असेल? नुकतंच एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत युक्रेनला जाण्यासाठी टॅक्सी बुक केली. या टॅक्सीचे भाडे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रेट मँचेस्टरच्या वर्स्ले येथे राहणारी ३४ वर्षीय लिओनी फील्ड्स ५ मार्च रोजी तिच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका बारमध्ये गेली होती जिथे तिने तिच्या मित्र- मैत्रिणींसोबत भरपूर मद्यपान केले. मद्यधुंद अवस्थेत सर्वजण रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चर्चा करू लागले. ही चर्चा रशियन सैन्याविरुद्ध लढा आणि युक्रेनला मदत करण्याच्या निर्णयापर्यंत चर्चा गेली.

चमत्कारिक गाव… इथं अनेकांना आहे एकच किडनी; कारण वाचून बसेल धक्का

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, लिओनीचा बॉयफ्रेंड सैन्यामध्ये आहे, त्यामुळे तिने तिच्या मैत्रिणींना सांगितले की जर तिचा बॉयफ्रेंड युद्धावर गेला तर ती देखील त्याच्यासोबत जाईल. घरी जाण्याची वेळ येईपर्यंत चर्चा इतकी गंभीर झाली होती की, घरी जाण्याऐवजी लिओनीने रशियन सैन्याशी लढण्यासाठी युक्रेनला जाण्याचा निर्णय घेतला. एका वेबसाइटशी बोलताना तिने सांगितले की, तिला वाटले की ती घरासाठी टॅक्सी बुक करत आहे पण ती वारंवार युक्रेनला जाण्यासाठी टॅक्सी बुक करत होती. सलग १ तास टॅक्सी बुक न झाल्याने तिने दुसरी टॅक्सी सेवा घेतली आणि रात्री उशिरा घरी पोहोचली.

दुसऱ्या दिवशी बँकेतून फोन आल्यावर तिला या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य समजले. बँक अधिकाऱ्यांना हे जाणून घ्यायचे होते की लिओनीसोबत कोणती आर्थिक फसवणूक तर झाली नाही ना. कारण टॅक्सी बुकिंगचे शुल्क इतके जास्त होते की बँकवालेही हैराण झाले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लिओनी इंग्लंड ते युक्रेन २,७२३ किमीसाठी कॅब बुक करत होती आणि तिचे भाडे ४ लाख रुपयांपेक्षा जास्त दाखवले जात होते. मोठी गोष्ट म्हणजे तिच्या खात्यात इतके पैसे नव्हते की कॅब बुक करता येईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunken woman leaves for ukraine to fight russian troops you will be surprised to hear the fare of the booked taxi pvp