दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी होऊ लागल्याने काही वर्षांपूर्वी गर्भलिंग निदान चाचणीवर आपल्या भारत देशात बंदी आणली. तसा कायदाही झाला. कायद्यात गर्भलिंग करणाऱ्या डॉक्‍टरांसह ही चाचणी करून घेणाऱ्या दाम्पत्यांवरही कारवाईची तरतूद करण्यात येत असते. पण विदेशात मात्र लिंग निदान करून एका उत्सवाप्रमाणेच हा आनंद साजरा करण्यात असतो. विदेशात लिंग तपासणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारची शिक्षा मिळत नाही. परदेशात, लिंग निदान झाल्यानंतर एक कार्यक्रम आयोजित करून मुलगा होणार की मुलगी हे सर्वांसमोर जाहीर केलं जातं. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मुलगा होणार की मुलगी हे सांगण्यासाठी दुबईतल्या एका जोडप्याने काही तरी हटके करण्याचा प्रयत्न केला खरा. पण काहीतरी हटके करण्याच्या नादात हे जोडपं नेटकऱ्यांच्या ट्रोलर्सचा निशाणा बनले आहेत.

दुबईतील एका जोडप्याने त्यांच्या होणाऱ्या बाळाचं जेंडर रिवीलच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा परसरलाय. त्यानंतर मात्र, या व्हिडीओमुळे एकच गदारोळ सुरू झालाय. दुबईतील या जोडप्याने आपलं होणारं बाळ हे मुलगा आहे की मुलगी हे जाहीर करण्यासाठी जरा हटके पद्धत वापरली आहे. हा उत्सव जगातील प्रसिद्ध बुर्ज अल अरब हॉटेल समोर साजरा करण्यात आलाय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक वाघ उंच उडी घेत काळ्या रंगाचा फुगा फोडताना दिसून येत आहे. फुगा फुटताच त्यातून गुलाबी रंग आजूबाजूला उळधू लागतो. यावरून हे जोडपं एका मुलीचे आई-वडील होणार आहेत, असं त्यांनी जाहीर केलंय.

पंजाने फुगा फोडत वाघाने सांगितलं मुलगा की मुलगी

हा व्हिडिओ शेअर होताच सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. अनेक सोशल मीडिया युजर्सनी होणाऱ्या बाळाची लिंग तपासणी करणं हे बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, लोक अशा गोष्टी का करतात? तुम्ही श्रीमंत आहात, म्हणून तुम्ही वन्य प्राण्यांशी कसंही वागाल का ?. त्याच वेळी आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिलं की, वन्य प्राण्यांना पाळणं ही कौतुकाची बाब नाही. बऱ्याच जणांनी याला ‘वाहियाद’ असंही म्हटलंय. मात्र, शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर लोकांच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. अनेक लोकांनी या व्हिडीओची आणखी दुसरी स्टोरी शेअऱ केली आहे.

‘lovindubai’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तीन लाखांपेक्षाही जास्त लोकांनी ही व्हिडीओ पाहिलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवरून युजर्सनी वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यास सुरूवात केलीय. काही युजर्सनी तर या व्हिडीओमधली वाघिणच प्रेग्नंट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केलीय. पण याबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. लोकांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केलाय.

Story img Loader