देशात टोमॅटोचे भाव वाढल्यापासून अनेक विचित्र किस्से ऐकायला मिळतात. कधी कोणी टोमॅटो सांभाळण्यासाठी बाऊन्सर ठेवताना दिसतो, तर कधी नवऱ्याने भाजीत टोमॅटो टाकल्याचा राग मनात धरून बायको घर सोडून माहेरी जाते. काही भागातून टोमॅटो लुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्याने झालेल्या गदारोळानंतर सरकारने त्याचा भाव ८० रुपये प्रतिकिलो केला आहे. तरीही, लोक अजूनही अधिक स्वस्त टोमॅटो शोधत आहेत. अशातच एका महिलेने चक्क दुबईवरुन टोमॅटो मागवल्याचा प्रकार समोर आला आहे.
ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका युजरने सांगितले की आईने दुबईत राहणाऱ्या तिच्या मुलीकडून १० किलो टोमॅटो मागवले आहेत. खरंतर मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत भारतात येत आहे. भारतात येण्यापूर्वी मुलीने तिच्या आईला दुबईतून काही हवे आहे की नाही असे विचारले. यावर आईने १० किलो टोमॅटो पाठव असं सांगितलं आणि मुलीनेही आईची १० किलो टोमॅटो पॅक करून भारतात पाठवले. दुसऱ्या मुलीने ट्विटरवर ही माहिती दिली.
पाहा पोस्ट –
हेही वाचा – VIDEO: “उद्या सगळेच पाकिस्तानातून सुना आणतील” सीमा हैदरला परत पाठवा, शेजाऱ्यांनी संशय व्यक्त करत केली मागणी
ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘माझी बहीण तिच्या मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी दुबईहून भारतात येत आहे. तिने आईला दुबईहून काही हवे आहे का, असे विचारले. यावर आई म्हणाली १० किलो टोमॅटो आण. आता बहिणीने सुटकेसमध्ये १० किलो टोमॅटो पाठवले आहेत. युजर्सनी हे देखील उघड केले की त्याच्या बहिणीने पर्लपेट स्टोरेज जारमध्ये टोमॅटो पॅक केले होते आणि ते सूटकेसमध्ये ठेवले होते. ते म्हणाले की आम्ही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. म्हणूनच मी लोणचे आणि चटणी असे काहीतरी बनवणार आहे.
हेही वाचा – उत्तर प्रदेशातील IAS अधिकारी निधी गुप्ता यांचा VIDEO व्हायरल, कारण वाचून व्हाल थक्क
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
ही ट्विटर पोस्ट वाचल्यानंतर यूजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले की, ‘या महागाईच्या काळात सर्वोत्कृष्ट कन्येचा पुरस्कार बहुधा त्या दिशेने जात आहे.’ तर दुसरी म्हणाली, ‘मुलगी तिच्या आईला दुबईला का घेऊन जात नाही आणि भारतात टोमॅटोचे भाव कमी येईपर्यंत तिथे का ठेवत नाही?’