Dubai Lady Makes Scammer Angry: तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर आता तेच तंत्रज्ञान वापरून एखाद्याला फसवण्याचा ट्रेंडही सुरु झाला आहे. अशिक्षित किंवा व्यवहार ज्ञान नसणारी बिचारी लोकं या अशा फसव्या तंत्रज्ञानाला बळी पडतात आणि कष्टाने जमवलेला पैसा एखाद्या चोराच्याच हातात नेऊन देतात. तसे तर हे स्कॅमर्स इतके तीक्ष्ण असतात की कोणाला लुबाडता येईल याचा अंदाज त्यांना पुरेपूर आलेला असतो पण काहीही म्हटलं तरी अंदाज कधी ना कधी चुकणारच ना. असाच एक स्कॅमर सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एका हुशार भारतीय तरुणीला फसवण्याचा त्याचा कट तिनेच हसून असा काही उलटून लावला की फोन ठेवताना बहुधा स्कॅमरच्या आवाजाचा व रागाचा पार १०० पार गेला असेल.
तर व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की एक तरुणी कॉलवर बोलत आहे, समोरून एक व्यक्ती तिला तिचा डेबिट कार्डचा नंबर विचारत आहे. बँकेतून कॉल केल्याचे सांगत त्याने तरुणीला तिचा डेबिट कार्ड नंबर विचारला आहे. यावेळी या तरुणीने त्याच्यासमोर आपल्याला काहीच कळत नसल्याचा आव आणून त्याची चांगलीच शाळा घेतली आहे.
बरं तो स्कॅमरही काही साधा आहे असं समजू नका, कारण थेट नंबर विचारण्याच्या ऐवजी तो तिला एक चुकीचा नंबर सांगून तो बरोबर आहे ना असा प्रश्न करतो. आपल्याला सवय असते की समोरच्याने चूक केली की आपण ती सुधारण्याच्या घाईत पटकन बोलून जातो. हाच स्वभाव ओळखून स्कॅमर तिला प्रश्न करतो, मग ही हुशार तरुणी तो नंबर चुकीचा आहे हे सांगते पण त्यानंतर बरोबर नंबर सांगण्याच्या ऐवजी ती भलताच नंबर सांगू लागते. स्कॅमरच्या हे लक्षात येतं आणि मग जे काय होतंय ते तुम्हीच बघा..
Video: स्कॅमरचीच घेतली शाळा
हे ही वाचा<< “कुलदीप यादवचं नशीब चमकतंय कारण..”, धीरेंद्र शास्त्रींबरोबरचे फोटो व्हायरल; नेटकऱ्यांची सडकून टीका
दरम्यान, १० लाखाहून अधिक लाईक्स असणाऱ्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून तिच्या हुशारीचे कौतुक केले आहे. शिवाय या स्कॅमरच्या फाजील आत्मविश्वासावर सुद्धा अनेकांनी टीका केली आहे. हा व्हिडीओ गंमत म्हणून तर पाहाच पण अशा प्रकारचे कॉल तुम्हालाही येत असतील तर सुरक्षित कसं राहावं हे सुद्धा शिकून घ्या.