Duck and Leopard Video: सिंह, वाघ आणि बिबट्या हे जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी मानले जातात. कोणतीही शिकार दिसली की ते झटक्यात नष्ट करतात. यापैकी बिबट्या अधिक धोकादायक आहे. त्याच्या सामर्थ्याशी स्पर्धा करणं क्वचितच कोणाला शक्य आहे. बिबट्या हा अत्यंत चतुर आणि चलाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडी किंवा गडद अंधारातही अत्यंत सराईतपणे शिकार करू शकतो. बिबट्या पूर्ण ताकदीने शिकार करतो. त्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शक्यतो तो माघार घेत नाही, त्यामुळेच जंगलात प्रत्येक वन्यप्राण्याला जगण्यासाठी प्रत्येक क्षण मोठा संघर्ष करावा लागतो, थोडीशी बेफिकीरीही त्याच्या जीवावर बेतते. आतापर्यंत बिबट्याचे तुम्ही असंख्य व्हिडीओ पाहिले असतील. बिबट्या लपून छपून योग्यवेळी इतर प्राण्यांवरती हल्ला करतो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका इवल्याशा प्राण्यानं बिबट्याचा गेम केलेला दिसतोय. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
जंगलात सर्वत्र शिकारी आहेत. अशा परिस्थितीत प्राणी आणि पक्षीदेखील सदैव सतर्क राहतात. पण, कधी कधी ते शिकारीच्या हातून पकडले जातात तेव्हा सुटण्यासाठी अशा युक्त्या वापरतात की पाहणाऱ्यांनाही आश्चर्य वाटू लागते की, त्यांनी हे काय आश्चर्यकारक केले आहे. असाच प्रकार एका छोट्या बदकाने केला आहे, ज्याला बिबट्या आपले भक्ष्य बनवणार होता.
त्याचं झालं असं की, बिबट्याने पकडलेलं चिमुकलं बदक आपल्या वाटेवरून जात होतं. पण, ते बदक अशी कृती करते की त्याची कलाकृती पाहून बिबट्याही थक्क होतो. या व्हिडीओमध्ये एक लहान बदक जंगलात जात असल्याचे दिसून येते. दरम्यान, बिबट्याची त्याच्यावर नजर पडते आणि बिबट्या झडप घालून बदकाच्या इवल्याशा पिल्लाला पकडते. पण, यात बदकाचं पिल्लूही हुशार, पळून जाण्याऐवजी बदकाच्या पिल्लानं मरण्याचं नाटक केलं. एखादं मृत प्रेत जसं पडून असतं, तसंच हे पिल्लू पडून राहिलं. यात हे लहान बदकाचे पिल्लू मेल्यासारखे दिसते. मात्र, असे असूनही बिबट्या त्याला सोडत नाही, तर दातांमध्ये दाबून मग या बिबट्यानं त्या पिल्लाला उचलून दुसरीकडे नेलं. तरीही बराच वेळ हा पिल्लू काहीही हालचाल न करता स्तब्ध राहतो. थोड्या वेळात बिबट्याची नजर दुसरीकडे जाताच संधीचं सोनं करून बदकाचं पिल्लू बिबट्याला चकमा देऊन पळून जातो अन् बिबट्या फक्त त्याच्याकडे बघत राहतो.
(हे ही वाचा : “डिअर सर…” कर्मचाऱ्यानं ३ शब्दात लिहिलं ‘रेजिग्नेशन लेटर’, राजीनाम्याची तुफान चर्चा, लिहिलं तरी काय? वाचून व्हाल लोटपोट )
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ १६ ऑगस्ट रोजी X हँडल @AMAZlNGNATURE वरून पोस्ट करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत २४ लाख व्ह्यूज आणि १७ हजार लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय शेकडो युजर्सनी बदकाच्या हुशारीचे कौतुक केले आहे.