Tiger Duck Viral Video: वाघ अगदी हुशारीने आपली शिकार पकडतो. जो वाघाची शिकार होणार त्याला समजण्याच्या आताच तो त्याच्यावर हल्ला करतो. एकदा का वाघाच्या तावडीत सापडलं की मग मात्र त्या प्राण्याची सुटका होणं अशक्यच. पण शिकारीत प्रत्येक वेळी वाघाला यश मिळेलंच असं नाही. सध्या अशी शिकार करायला गेलेल्या वाघाची कशी फजिती झाली याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, हे मात्र नक्की.

एका इवल्याश्या बदकाची शिकार करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या वाघाला बदकाने मोठ्या शिताफीनं दिवसाढवळ्या तारे दाखवले. हे ऐकून सुरूवातीला कदाचित तुम्हाला विश्वास होणार नाही. भल्याभल्यांचा थरकाप उडवणाऱ्या वाघाची फजिती झालेलं तुम्ही आतापर्यंत कधी पाहिलं नसेल. पण सध्या असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पाण्यातल्या बदकाची शिकार करणं या वाघाला चांगलंच महागात पडलं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आता सायकल चालवून तुम्ही बनवू शकता फळांचा रस! कसं ते पाहा…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक वाघ पाण्यात पोहत समोर असलेल्या एका इवल्याश्या बदकाची शिकार करण्याचा प्रयत्न करतो, परंतु समोरून येणार वाघ आपली शिकार करणार हे या बदकाला समजतं. ज्यावेळी हा वाघ बदकाच्या जवळ यायला लागतो त्याचवेळी हा इवलासा बदक हुशारीने पाण्यात डुबकी मारत गायब होतो. काही क्षणांनंतर बदक पाण्यातून दुसऱ्याकडे पोहोचतं. जोपर्यंत वाघ तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत बदक पुन्हा चकवा देतो आणि गायब होतो. या बदकाची हुशारी लोकांना आवडू लागली आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एक वर्षांनी मालकाला भेटल्यानंतर हत्तीने मिठी मारली! मोठ्या स्वॅगमध्ये केलं स्वागत, पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कागदी विमानाप्रमाणे टीनचे छप्पर उडून कारवर कोसळले, ऑस्ट्रेलियामधल्या वादळाचा VIDEO VIRAL

हा मजेदार व्हिडीओ ट्विटरवर @buitengebieden_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘बदक लपाछुपी खेळतोय’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. अवघ्या ४६ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख २८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ५ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे.

त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘निसर्गाचे सौंदर्य. हा बदक उडू शकत नाही, परंतु बलाढ्य शिकारीपासून वाचण्यासाठी निसर्गाने त्याला इतकी चांगली गुणवत्ता दिली आहे’, तर दुसर्‍या एका युजरने लिहिलं की, ‘तुमचा विरोधक कोण आहे हे एकदा कळलं की तुम्हाला सर्वात जास्त आत्मविश्वास मिळतो.” प्रत्येक जण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बदकाच्या हुशारीचं कौतुक करताना दिसून येत आहेत.