मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘नाटू नाटू’ गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचं कारणं म्हणजे, चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा ९५ वा ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. यामध्ये ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला. त्यामुळे या गाण्याची आणि त्या गाण्याच्या डान्सची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नाटू नाटू’ला ऑस्कर पुरस्कार घोषित होताच जगभरात या गाण्यासह डान्सची जगभरात क्रेझ पाहायला मिळाली. शिवाय व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी त्या गाण्यावर डान्स करत त्याचे रील शेअर करण्याचा ट्रेंडदेखील जोरदार सुरु झाला. अनेकांनी आपले व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केले. अशातच आता उद्योगपती हर्ष गोयंका यांना देखील या गाण्याची भुरळ पडल्याचं दिसून येत आहे. कारण त्यांनी ट्विटरवर बदकांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते नाटू नाटू गाण्यावर डान्स करत असल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- तरुणाने गिळली तब्बल ५६ ब्लेड; गळ्यावर जखमा आणि शरीरावर सूज…, डॉक्टर म्हणाले “नैराश्यातून…”

हेही पाहा- वंदे भारत एक्सप्रेस उंच घाटात पोहोचताच…, महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा थरारक Video पाहाच

हर्ष गोयंका हे सोशल मीडियावरील त्यांच्या हटके पोस्ट्ससाठी ओळखले जातात, त्यांच्या फॉलोअर्ससाठी ते अनेकदा मनोरंजक गोष्टी शेअर करतात. त्यामुळे अनेकांना त्यांच्या पोस्टची उत्सुकता लागून असते, अशातच आता त्यानी बदकांचा हटके असा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन बदक नाटू नाटू गाण्याच्या स्टेप्स करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ एडीट केला असून त्यामध्ये नाटू नाटू गाणं अॅंड केलं आहे. त्यामुळे हे बदक सेम तसाच डान्स करत असल्याचा भास पाहताना होत आहे.

व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये गोयंका यांनी लिहिलं आहे की, बदकंही आता नाटू नाटू सादर करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने हे खूप मनोरंजक असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने ऑस्करचा फेवर त्यांनाही चढला असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ खोटा असून तो एडीटींग करुन व्हायरल केला जात आहे, असंही म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ducks did a wonderful dance on the song natu natu harsh goenka shared the trending video jap