सोशल मीडियावर अनेक लोकांनी केलेल्या भन्नाट आणि जबरदस्त जुगाडाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही जुगाड यशस्वी होतात तर काही जुगाड ते करणारांच्याच अंगलट येतात. सद्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने रोड रोलर बोटमध्ये चढवण्यासाठी केलेला जुगाड त्याला चांगलाच महागात पडल्याचं दिसत आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काही लोकांनी तर जुगाडावर आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा थोडा डोक्याचा वापर केला असता तर रोड रोलर पाण्यात पडला नसता असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती दोन फळ्यांच्या साह्याने बोटीत जड वजनाचा रोड रोलर चढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी अचानक हा रोलर पाण्यात पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे “एवढा मोठा रोलर बोटीवर चढवल्यावर बोटीचा तोल बिघडणारच, कारण बोट पाण्यावर चालते ती रस्त्यावर नव्हे.” असंही नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा- माकडाने पळवला महिलेचा मोबाईल; परत मिळवण्यासाठी करावी लागली अनोखी डिल, VIDEO पाहून हसू आवरणे होईल कठीण

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बोटीत रोड रोलरवर चढवताना दिसत आहेत. यावेळी त्याने रोलर बोटीत नेण्यासाठी काही जुगाड तयार केल्याचंही दिसत आहे. तर व्हिडीओच्या सुरुवातीला तो व्यक्ती रोलरला बोटीवर व्यवस्थित घेऊन गेल्याचं दिसत आहे. पण काही सेकंदातच बोट हलू लागते. यावेळी रोलर पाण्यात पडू नये म्हणून तो व्यक्ती रोलर ऑपरेट करण्याचा प्रयत्न करतो. पण पाण्याच्या लाटा आणि रोलरच्या वजनामुळे बोट अस्थिर होते आणि गोल चाकांमुळे रोलर थेट पाण्यात पडतो. तर रोलर पडणार असं जाणवताच रोलरशेजारी उभा असलेला व्यक्ती थेट पाण्यात उडी मारतो.

हा व्हायरल व्हिडीओ @proasfalto नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत २ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ३ लाख ७८ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. शिवाय व्हिडीओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं, “रॉकेट सायन्स” तर दुसऱ्याने लिहीलं, “केवळ देशी जुगाडांवर अवलंबून राहू नका, कधी कधी तुमचं डोकंही वापरा.”