पुणे तिथे काय उणे असे म्हणतात ते उगाच नाही. पुण्यात कधी काय घडले याचा काही नेम नाही. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्यांची संध्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती प्रवाशांची संख्या पाहता पीएमपीएलची बस संख्या आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. दरम्यान पुण्यातील काही भागांमध्ये मेट्रो सुरु झाल्यामुळे अनेक प्रवाशांना गर्दीने भरलेल्या बसमधून प्रवास करण्यापासून सुटका मिळत आहे. पण रविवारी रामवाडी मेट्रो स्टेशनला प्रवाशांची गर्दी वाढल्याने अचानक मेट्रो बंद पडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चत आले आहे.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर piyushsocial नावाच्या खात्यावर प्रवाशांच्या गर्दीमुळे मेट्रो बंद पडल्याचे दोन व्हिडीओ पोस्ट करण्यात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”ओव्हरलोडमुळे #पुणे स्टेशन ते रामवाडी मार्गावर मेट्रो बंद पडली” व्हायरल व्हिडीओ पाहून पुणेकरांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. काहींनी वारीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली असावी असा अंदाज व्यक्त केला तर कोणी पुणे मेट्रोची अवस्था मुंबई लोकल सारखी झाली आहे असे मत व्यक्त केले.

हेही वाचा – याला म्हणतात चतुरता! जीव वाचवण्यासाठी माकडाने केला जीवाचा आकांत, बिबट्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहिला

रविवारी पावसामुळे पुण्यात काही रस्ते बंद पडले होतो. याच दिवशी पुणे शहरात संत ज्ञानोबा आणि संत तुकराम यांच्या पालखीचे आगमन देखील झाले होते त्यामुळे शहरातील काही महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहे. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, वाकडेवाडी बस स्टॉप, स्वारगेटचा काही भाग या दिवशी बंद होता. त्यामुळे पुणेकरांसाठी पुणे मेट्रो हा वाहतूकीचा एक चांगला पर्याय होता त्यामुळे अनेकांनी मेट्रोने प्रवास करण्यास पसंती दिली असावी. दरम्यान काही प्रवासी पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने पुण्यात आले असावे असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. पुणे मेट्रोमध्ये प्रवाशांची संख्या वाढली. दरम्यान प्रवाशांची गर्दी झाल्यामुळे मेट्रो बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. यापुर्वी तांत्रिक कारणामुळे पुणे मेट्रो बंद पडली आहे. दरम्यान मेट्रो नक्की का बंद पडली याबाबत मेट्रो प्रशासनाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान काही वेळ मेट्रो बंद पडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. काही वेळाने मेट्रोची सेवा सुरुळीत सुरु करण्यात आली.

पुणे मेट्रो स्थानकावर सरकत्या जीन्यावर पडून एका प्रवाशाचा मृत्यू
दरम्यान, सोमवारी पुणे मेट्रो स्थानकावर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सोमवारी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. हा प्रवासी स्थानकातील सरकत्या जिन्यावर अचानक पडला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तिथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रवाशाच्या मृत्यूचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत.

हेही वाचा – “हे फक्त भारतातच होऊ शकतं!” T-20 World Cup जिंकल्यानंतर भारतीय संघाला तरुणाची हटके सलामी, पाहा Viral Video

गणेशोत्सवात मेट्रोची स्वारगेटपर्यंत धाव
पुणे मेट्रोची स्वारगेटपर्यंत सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, जुलैअखेरीस ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे महामेट्रोने नियोजन केले आहे. स्वारगेट मेट्रो सुरु झाल्यामुळे अनेक प्रवाशांची सोय होणार आहे.