लग्न म्हंटलं की हल्ली नवरा नवरीचा डान्स हा ठरलेला असतोच. आयुष्यातल्या या खास दिवशी नवरा आणि नवरी स्टेजवर डान्स परफॉर्म करत हा दिवस साजरा करण्याचा हल्ली ट्रेंडच आलाय. हल्लीच्या काळात नववधू सजून मंडपात नवरदेवाची वाट पाहण्याऐवजी संपूर्ण वऱ्हाडी मंडळींसमोर आपलं प्रेम व्यक्त करणं पसंत करत असतात. सोशल मीडियाच्या जगात असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. परंतु काही व्हिडीओ शेअर होताच ते व्हायरल होऊ लागतात आणि बरेच दिवस पाहिले जातात. तुम्ही अनेकदा नवरीबाईच्या डान्सचे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या एका नवरदेवाच्या डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील नवरदेवाने स्वतःच्या लग्नात इतका जबरदस्त डान्स केलाय तुम्ही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहाल. हा डान्स व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून साऱ्यांच्याच पसंतीस पडत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवरदेव स्टेजवर धडाकेबाज डान्स करताना दिसून येतोय. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटातील ‘क्यूटी पाई’ गाण्यावर त्याने जबरदस्त डान्स केला आहे. आपल्या होणाऱ्या पतीचा हा तुफान डान्स पाहून स्टेजखाली उभी असलेली नवरीसुद्धा स्वत:ला रोखू शकली नाही आणि ती सुद्धा त्याच्यासोबत स्टेजखाली थिरकू लागते. भरत धिंग्रा असं या नवरदेवाचं नाव असून हा व्हिडीओ लग्नातल्या एका संगीत समारंभाचा आहे.

आणखी वाचा : ‘स्पायडर मॅन’चा मास्क घालून चित्रपट पाहण्यासाठी आला, तिकीट काउंटरवरच्या महिलेने ‘हा’ विचित्र प्रश्न विचारला… पाहा VIRAL VIDEO

लग्नात नवरदेवाने इतका धांसू डान्स केलाय की लग्न मंडपातील वऱ्हाडीं मंडळी फक्त बघतच राहिली. इतकंच काय तर नवरी सुद्धा अवाक झाली. आपल्या लग्नात हा नवरदेव मनसोक्त थिरकताना दिसून येतोय. स्टेजवर डान्स करता करता नवरदेवाने त्याच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन्स दिले आहेत, ते पाहून सारेच जण या नवरदेवाच्या प्रेमात पडले आहेत. एरव्ही लग्न मंडपात नवरी साऱ्यांच्याच नजरा आपल्याकडे खेचून घेते. पण या व्हिडीओमध्ये लग्नात नवरदेवाने मात्र खरी रंगत आणलीय. हा व्हिडीओ खूपच गोड असून यातल्या नवरी नवरदेवाची धम्माल पाहून साऱ्यांचं मन पिघळून गेलंय.

आणखी वाचा : सेम टू सेम श्रीदेवीसारखी दिसणारी तरूणी आहे तरी कोण ? VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण !

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मस्ती मस्तीत रॉकेट पेटवला, पण तो उडत उडत बिल्डिंगमध्ये घुसला, पुढे जे झालं ते पाहा!

theweddingministry नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. स्टेजवर डान्स करताना नवरदेवाचा उत्साह पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ८ लाख ५८ हजार व्ह्यूज मिळाले असून जवळपास ३२ हजारांपेक्षा जास्क लोकांनी लाईक केलंय. “या उत्साही नवरदेवासाठी एक लाईक तर मिळाचा पाहिजे…” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : आईस्क्रीमवाल्याच्या अंतिम यात्रेचा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल

या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्य कमेंट्सचा वर्षाव होताना दिसून येत आहे. काहींनी नवरदेवाच्या एक्सप्रेशन्सचं कौतुक केलंय, तर काहींनी नवरा नवरीच्या जोडीवर आपलं प्रेम व्यक्त केलंय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

Story img Loader