लग्न म्हटलं की नाचगाणं आणि धमाल मस्ती आलीच. त्यातही जर बहिणीचं लग्न असल्यावर मग काय करवल्यांचा थाट काही औरच असतो. लग्नात अगदी नटून थटून इथून तिथून सुरू असलेली त्यांची लुडबुड आणि बहिणीचं लग्न आहे म्हणून मोठ्या थाटात मिरवणाऱ्या करवल्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एका करवलीचा धमाकेदार व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. बहिणीच्या लग्नात या व्हिडीओमधल्या करवलीने इतका जबरदस्त डान्स केलाय की सारेच जण थक्क झाले. या व्हिडीओमध्ये नवरीची बहीण भर मंडपात दिलखुलासपणे डान्स करत आहे. तिचा हा धांसू डान्स पाहून मंडपातले पाहूणे सुद्धा स्वतःवर आवर घालू शकले आणि तिच्यासोबत थिरकू लागले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिलाय. काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाची वरात बँक्वेट हॉलमध्ये पोहोचलेली आहे आणि नवरी नवरी लग्नाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. त्याचवेळी नवरीची बहीण स्टेजवर धांसू एन्ट्री करते आणि बॅकग्राउंडमध्ये सुपरहिट पंजाबी सॉंग ‘बिजली-बिजली’ हे गाणं ऐकू येतं. नवरीच्या बहिणीने डान्स करताना चमकदार लेहेंगा परिधान केलेला आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीने स्वतःच्याच लग्नात इतका जबरदस्त डान्स केलाय की बघणारे फक्त बघतच राहिले
भर जरी लहंगा आणि त्यावर अवजड दागिने परिधान करून ही करवली मोठ्या जोशमध्ये डान्स करताना दिसून येतेय. तिच्या जोशपूर्ण डान्स स्टेप्स पाहूनच तुम्हाला कल्पना येईलच की करवलीला बहिणीच्या लग्नाचा किती आनंद झाला आहे. तिच्या चेहऱ्यावर बहिणीच्या लग्नाचा आनंद अगदी स्पष्टपणे झळकताना दिसून येतोय. डान्स करतानाचे तिचे हावभाव आणि तिला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे. लग्नसमारंभातील वऱ्हाडी मंडळी तसेच इतर पाहुणे नवरदेवाच्या बहिणीचा डान्स पाहत आहेत. टाळ्या वाजवून ते तिचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. नवरीच्या बहिणीच्या हा धांसू परफॉर्मन्स पाहून मंडपातील वऱ्हाडी मंडळी सुद्धा स्वतःला आवरू शकले नाहीत आणि जोरजोरात ओरडून या नवरीच्या बहिणीला चिअर अप करू लागतात.
आणखी वाचा : थंडीत सकाळी उठायला आळस येतो म्हणून ही आयडिया वापरली, एकदा हा Viral Video पाहाच
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : या चिमुकल्याने आईकडे स्वतःच्या लग्नासाठी तगादा लावला; म्हणतो, “माझेही मुलं होतील!”
सोशल मीडियावर नवरीच्या बहिणीचा डान्स चांगला व्हायरल झाला आहे. हा डान्स पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच हा व्हिडीओ ग्रुपला देखील शेअर करत आहेत. हा व्हिडीओ ‘shaadisaga’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘नवरीच्या बहिणीने इतका जबरदस्त डान्स केलाय की जणू तिच्याकडे कुणी पाहतच नाही’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत याला १ लाख ७० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.