घरात बसून आपल्यापैकी अनेकजण स्नॅक्स किंवा जेवणाची ऑर्डर करतात, थोड्यावेळातच डिलिव्हरी बॉय त्या ऑनलाइन फूडची डिलिव्हरी करायला येतो. परिस्थिती कशीही असली तरी डिलिव्हरी ग्राहकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे यासाठी चक्क ट्रेनमागे धावणाऱ्या एका डन्झो एजंटचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्दा या डन्झो एजंटचं कौतूक कराल. तसंच हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पान असो, साखर असो, किंवा मग मटण…तुम्ही सांगाल ते सामान डन्झो थेट तुमच्या घरी आणून देतो. शहरातल्या शहरात तुमचं पार्सल पोहोचविण्याचं कामही डन्झो करतं. बंगळूर, नोएडा, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, पुणे आणि मुंबई अशा शहरांमध्ये डन्झो काम करतं. ग्राहकांना वेळेत पार्सल मिळावं यासाठी या डन्झोचा एजंट चक्क ट्रेनमागे धावताना दिसून आला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ग्राहक ट्रेनच्या दारावर उभा राहून त्याला जोरात धावण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसतोय. तसा तसा हा डन्झो एजंट जोरजोरात धावतो आणि शेवटी तो आपल्या ग्राहकाला त्याचं पार्सल देऊनच मोकळा श्वास घेतो. आपलं पार्सल मिळाल्यानंतर ट्रेनमध्ये असलेला ग्राहकसुद्धा आनंदाने उड्या मारताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येतोय. तसंच आपण ग्राहकाला पार्सल देण्यात यशस्वी झाल्याचं समाधानही या डन्झो एजंटच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडत होता अन् लोक स्माईल देत सेल्फी काढत होते…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बाप रे बाप! शिंगे असलेला साप….VIRAL VIDEO पाहून आश्चर्यचकित होऊन जाल!

हा व्हिडीओ मुंबईस्थित प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना यूजरने याला ‘फुल-ऑन दिलवाले दुल्हनी ले जायेंगे मधला सीन’ असं संबोधलंय. या सीनमध्ये अभिनेत्री काजोलने साकारलेली सिमरन देखील ट्रेनच्या मागे धावत होती. हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत १.४ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.