संजय लीला भन्साळी यांच्या “हीरामंडी”ने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली. नेटफ्लिक्स शोला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, त्याच्या उत्कृष्ट वेशभूषा, सुंदर नृत्य आणि भावपूर्ण गाण्यांनी सिनेमा रसिकांना आकर्षित केले. हीरामंडीच्या गाण्यांवर असंख्य व्हिडिओं व्हायरल होत आहे. त्यापैकी स्पेनच्या माद्रिदच्या रस्त्यावर “सकल बन” या गाण्यावर भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य करणाऱ्या नृत्यांगणाच्या जोडीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता व्हायरल झालेला हा व्हिडिओ इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयआयसीआर) कलाकार पूर्णता मोहंती यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मोहंती यांनी ओडिसी फॉर्मसाठी एक आकर्षक राखाडी-गुलाबी पट्टा असलेली साडी नेसली होती, तर दुसऱ्या महिलेने भरतनाट्यमसाठी फिकट जांभळ्या-सोनेरी रंगाची साडी नेसली होती. दोघींनी पारंपारिक पद्धतीने वेषभुषा केली होती. दोघींचे सकल बन या गाण्यावरील नृत्य पाहून नेटकरी थक्क झाले आहे.

व्हिडिओ शेअर करताना मोहंती यांनी लिहिले की, “सकाळ बन हा कवी अमीर खुसरो यांच्या गुरू हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या भक्तीतून निर्माण झालेली आहे. हिंदू परंपरा स्वीकारून खुसरोने आशेचे प्रतीक असलेल्या पिवळ्या पोशाखात स्वतःला सजवले. पिवळ्या पोशाखात सजलेल्या, त्यांच्या देवतेला मोहरीची फुले(mustard flowers) अर्पण केलेल्या हिंदू स्त्रियांपासून ते प्रेरित झाले. मोहरीच्या फुलांसह (mustard flowers)‘सकल बन’ची मनमोहक रचना सादर केली आहे.

हेही वाचा – भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दिली धडक, थेट पुलाच्या काठावर जाऊन लटकला ट्रक अन् चालक; थरारक अपघाताचा Video Viral

व्हिडिओला प्लॅटफॉर्मवर ३,७४,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले कारण सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दोघींच्या नृत्याचे कौतूक केले आहे. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना, एकाने कमेंट केली, “तांडवपासून उद्भवलेल्या दोन भिन्न नृत्य प्रकारांचे साक्षीदार होणे खूप आनंददायी आहे: ओडिसी आणि भरतनाट्यम.” आणखी एका युजरने लिहिले, “या मालिकेच्या संगीताची चांगली गोष्ट आहे. मी अनेक प्रतिभावान भारतीय शास्त्रीय नर्तकांना त्यांच्या नृत्यप्रकारांचे सादरीकरण आणि प्रतिनिधित्व करताना पाहू शकतो.”

हेही वाचा – मँगो पाव? विचित्र रेसिपी पाहून चक्रावले नेटकरी, व्हिडीओ होतोय व्हायरल!

“ओडिसी आणि भरतनाट्यम दोन्हीचे सुंदर प्रतिनिधित्व केले. अप्रतिम,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

राजा हसन यांनी गायलेले, ‘सकल बन’मध्ये मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सेगल यांच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Duo takes over streets of spain with bharatanatyamodissi dances to sakal ban from heeramandi watch snk
Show comments