देशभरामध्ये नवरात्री आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मिडियावरही हा उत्साह दिसून येत आहे. रोज वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांमधील फोटो, गरब्याचे व्हिडिओ अशा अनेक गोष्टी सोशल मिडियावर दिसून येत आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या देवींचेही फोटो व्हॉट्सअप स्टोरी आणि फेसबुकवर शेअर केले आहेत. असं असतानाच एका खास फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घतले आहे. शाळेतील काही लहान मुलांनी साकारलेली दूर्गा या फोटोमध्ये दिसत असून ट्विटवर या फोटोची बरीच चर्चा आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा आणि अभिनेत्री रविना टंडनही या फोटोच्या प्रेमात पडले असून त्यांनी हा फोटो ट्विटवरुन शेअर केला आहे.
‘मी पाहिलेला हा आतापर्यंत सर्वात गोड फोटो आहे. या फोटोमध्ये लहान मुलांनी दुर्गा माता साकारली आहे,’ असं ट्विट रविनाने केले आहे.
So far the sweetest picture and portrayal of Ma Durga Devi by kids that I’ve seen on the net. Adorable . Jai Mata Di pic.twitter.com/UtLMxqY3cN
— Raveena Tandon (@TandonRaveena) October 7, 2019
या फोटोमध्ये शाळेच्या गणवेशामध्येच मुलांनी महिषासुरमर्दनी स्वरुप साकारले आहे. एका युजरने पोस्ट केलेला हा फोटो आनंद महिंद्रांनीही रिट्विट केला आहे. ‘मी मंडपामध्ये पाहिलेल्या कोणत्याही देखाव्यापेक्षा हा फोटो जास्त सरस आहे. जेव्हा जेव्हा मानवामधील भावना दाखवायच्या असतात तेव्हा मुलं ते उत्तम प्रकारे दाखवतात. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा,’ असं ट्विट महिंद्रा यांनी केले आहे.
That is, indeed, superior to the largest & most dramatic pandals I’ve seen. Children will always triumph when it comes to matters of the human spirit…Greetings & good wishes to everyone on this auspicious day of Maha Ashtami Puja https://t.co/Bo4C0YVeLi
— anand mahindra (@anandmahindra) October 6, 2019
या फोटोला हजारोंच्या संख्येने रिट्विट केले असून शेकडो युझर्सने यावर कमेंट करुन मुलांच्या या कलाकारीचे कौतूक केले आहे.