दसऱ्याच्या दिवशी रावणदहन केले जाते. हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते. यंदा २४ ऑक्टोबर रोजी देशभरात रावणदहन सोहळा पार पडला. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. एकीकडे रावणदहन सोहळ्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र रामलीलाच्या मंचावर उभा राहून गुटखा खाणाऱ्या रावणाचा व्हिडीओ जाम चर्चेत आला आहे; ज्यामध्ये रावण गुटखा खाताना दिसत आहे. या व्हायरल व्हि़डीओवर आता खूप चर्चाही रंगत आहेत.
गुटखा खाणाऱ्या रावणाची सोशल मीडिया युजर्सनी घेतली फिरकी
हा व्हायरल व्हिडीओ लखनऊ किंवा कानपूरचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणारी एक व्यक्ती मंचावर उभी राहून रावणाच्या वेशात गुटखा खातेय. अंगावर काळे अन् सोनेरी रंगाचे भरजरीत वस्त्र, डोक्यावर १० तोंडांचा मुकुट अशा रावणाच्या वेशामध्ये ती व्यक्ती प्रेक्षकांसमोर गुटखा खाताना दिसतेय. त्याचा हा अंदाज पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरले नाहीय यावेळी तिथे उपस्थित प्रेक्षकांनी त्याचा व्हिडीओ बनवला. आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून, लोक त्यावर मजेशीर कमेंट करीत आहेत.
हा मजेशीर व्हिडिओ @Live_Gyan नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, लखनऊ, कानपूरचा हा रावण आहे. ‘रजनीगंधा’ खातोय. त्यानं जाहिरात पाहिली असेल, ‘मुॅंह में रजनीगंधा, कदमो में दुनिया.’ या व्हिडीओवर आता युजर्सही मजेशीर कमेंट्स करित आहेत. एका युजरने लिहिले की, फक्त ‘रजनीगंधा’ खाऊन जग माझ्या पायाशी येत असेल, तर मी उगीच तपश्चर्या करीत होतो. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, स्वत:चा वध होण्याच्या काही क्षण आधी लंकापती, लंकेत बसून मंत्रमुग्ध नर्तकांमध्ये शांतपणे ‘रजनीगंधा’ खाताना.
आणखी एका युजरने मजेशीर कमेंट करीत लिहिले की, आता रावण कानपूरचा आहे म्हणून तो ‘रजनीगंधा’ खाणार. पण जर तो दिल्लीचा असेल, तर तो छोले-कुलचा खाताना दिसला असता. अशा प्रकारे लोक या रावणाच्या वेशभूषेतील व्यक्तीची चांगलीच फिरकी घेत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, काहींचे म्हणणे आहे की, गुटखा खाऊन या रावणाने स्वत:ला कलियुगातील रावण असल्याचे सिद्ध केले आहे. म्हणजे ज्यावेळी तो गुटखा खाईल, तेव्हा त्याला रावण म्हटले जाईल.