भारतीय रस्त्यांवर अनेकदा अतरंगी स्टंटबाजी केली जाते. अनेकदा लोक आपले नको ते धाडस आणि असामान्य पराक्रम लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात. असा एका व्यक्तीचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एक इलेक्ट्रिक रिक्षाचालक एका रहादारी असलेल्या उड्डाणपुलावर विचित्र पद्धतीने इ रिक्षा चालवत आहे. मोठमोठ्या लाकडी फळ्या लावलेल्या त्याच्या ई- रिक्षावर तो व्यक्ती बसण्याऐवजी थेट झोपला आहे आणि पुलावर रिक्षा चालवत आहे.

व्हिडीओमध्ये रिक्षाचालक ज्या पद्धतीने रिक्षावर झोपला आहे ते पाहून अनेकांनी त्याची तुलना”सुपरमॅनसह केली. व्हिडीओमध्ये दिसते की रिक्षाचालक लाकडी फळ्यांवर झोपला आहे. पोटावर झोपून त्याने हॅंडल हातामध्ये पकडला आहे आणि रिक्षा चालवत आहे. पुलावर गाड्यांची ये-जा सुरु असताना हा व्यक्ती धोकादायरित्या रिक्षा चालवत आहे अन् स्वत:बरोबर इतरांचा जीव धोक्यात टाकत आहे. हा व्हिडिओ पुलावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीने शूट केल्याचे दिसत आहे.

“भारतात सापडला फ्लाइंग सुपरमॅन, खरा हेव्ही(चांगला) ड्रायव्हर,” अशी कॅप्शन X वर पोस्टसह दिली आहे.

एका वापरकर्त्याने कमेंट केली की, “मी लहान असताना त्याच्याप्रमाणेच माझी बेड रस्त्यावर चालवण्याचे माझे स्वप्न होते.” आणखी एका व्यक्तीने कमेंट केली, “मला वाटते की भारत नवशिक्यांसाठी नाही.”

तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “तो खरा हेव्ही(चांगला) ड्रायव्हर आहे व्वा,”

असंख्य लोकांनी निदर्शनास आणून दिले की, पुरुषाला आपले काम पूर्ण करण्यासाठी अनेक धोके पत्करावे लागतात. “ एक खरा कौटुंबिक पुरुष त्याच्या मुलांसाठी अन्न मिळवण्यासाठी काम करत आहे हे मला दिसते… हे मजेशीर नाही,” एका वापरकर्त्याने पोस्ट केले.

Story img Loader