प्रत्येक व्यक्तीला मोकळ्या गार्डनमध्ये, शहराच्या बाहेर किंवा मग नॅशनल पार्कमध्ये जाऊन खेळायला बसायला आवडतं. बरेच लोक तर जंगल किंवा नॅशनल पार्क जवळ राहतात. त्यांच्या आवारात वाघ, बिबट्या अशा हिंस्र प्राणी येऊन लहान मुलांना पळवून लावतात. बऱ्याचवेळा लहान मुलांवर हल्ला केल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ नेचर नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. वडिलांसोबत बागेत खेळायला हा लहान मुलगा आलेला असतो. पण वडिलांची वडिलांची नजर हटताच एका गरुडाने त्याच्यावर हल्ला केला. मुलाला घेऊन हा पक्षी जमिनीपासून आकाशात उंच भरारी घ्यायला जातो. तो आकाशात उंच जाणार तेव्हाच मुलाच्या वडिलांची त्याच्यावर नजर पडते आणि ते पक्ष्याच्या तावडीतून आपल्या मुलाला सोडवण्यासाठी त्याच्या मागे धावत सुटतात.
आणखी वाचा : एकाच वेळी फणा काढलेल्या तीन सापांसोबत खेळत होता हा मुलगा आणि…; बघा Viral Video
आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी
आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?
हे पाहताच पक्षीही घाबरतो आणि तो त्या मुलाला सोडून जातो. जसा तो मुलाला सोडतो तसा मुलगा जमिनीवर पडतो. पण अंतर फार नसल्याने मुलाला काही होत नाही. त्याचे वडील त्याच्याजवळ जातात आणि त्याला आपल्या कुशीत घेतात. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत.