Viral video: सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. शिकारी पक्षातील सर्वच पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून गरूड हा पक्ष्यांचा राजा एक ते दीड मैलावरची शिकार पाहू शकतो. सर्व पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे. असं म्हणतात की, त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो. गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करु शकतो. मात्र विचार करा या विशाल प्राण्याची जर छोट्याशा खेकड्यानं शिकार केली तर? हो कुणालाच कमी समजू नका कारण डाव कधी उलटेल हे कुणीच नाही सांगू शकतं. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही हेच पाहायला मिळालं. चिमुकल्या खेकड्याने भल्यामोठ्या गरुडाची शिकार केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
खेकड्याने आपल्या नाग्यांनी एकदा का कुणाला पकडलं तर सोडता सोडत नाही. खेकड्याचे नांगे इतके मजबूत असतात की ते एखाद्याला रक्तबंबाळ देखील करू शकतात. समुद्री खेकडे हे फारच खतरनाक असतात. एकदा का त्यांनी डेंगा मारला की मग रक्त काढल्याशिवाय ते मागे येत नाहीत. अन् त्यात जर का लाल रंगाचा खेकडा असेल तर मग विचारायलाच नको. अशाच एका खेकड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या एवढ्याश्या खेकड्यानं चक्क भल्यामोठ्या गरूडाची शिकार केली आहे. विश्वास बसत नाही ना मग पाहा हा व्हिडीओ.
नेमकं काय घडलं?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गरूड नदीच्या काठावर बसून पाण्यात पोहणाऱ्या खेकड्याची शिकार करत होता. पण त्यानं या खेकड्याला चुकीच्या पद्धतीनं पकडलं. परिणामी खेकड्यानं पूर्ण ताकतीनिशी या गरूडाची चोच आणि डोळे पकडले. अर्थात त्याच्या या कृतीमुळे खेकडा भडकला अन् त्यानं चांगलाच चावा घेतला. हळूहळू त्यानं गरूडाच्या डोक्यावर सुद्धा विळखा घातला. परिणामी गरूडला प्रचंड वेदना जाणवू लागल्या. या खेकड्याला खाली फेकण्यासाठी गरूड धडपड करून लागला. पण या नादात तो खाली पाण्यात पडला. शेवटी तो कसाबसा पाण्यातून बाहेर आला आणि आकाशात झेप घेतली.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ सोशल मीडियावर waowafrica नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला शेअर केल्यापासून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… “आपल्या शत्रूला कधीही हलके समजू नये.” दुसऱ्या युजरने लिहिले…””वेळ प्रत्येकाची येते फक्त विश्वास ठेवा”.