Viral Video : तहानलेल्या कावळ्याची गोष्टी तुम्ही अनेकदा लहानपणी पुस्तकात वाचली असेल. एकदा एका कावळ्याला खूप तहान लागते. तेव्हा पाण्याचा शोध घेताना त्याला एक पाण्याने भरलेले भांडे दिसते पण त्या भांड्यातील पाण्याची पातळी खाली गेलेली असते त्यामुळे कावल्याला चोचीने पाणी पिता येत नाही. तेव्हा हा चतुर कावळा त्या भांड्यात खडे टाकायला सुरुवात करतो. खडे टाकल्यानंतर पाण्याची पातळी वाढू लागते. त्यामुळे तो पोटभर पाणी पितो.ही तहानलेल्या चतुर कावळ्याची गोष्ट तुम्ही ऐकली किंवा वाचली असावी पण तुम्ही कधी विचार केला का? प्रत्यक्ष आयुष्यात असा प्रसंग कावळ्यासमोर आला तर कावळा काय करेल? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खालील व्हिडीओ पाहून मिळू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कावळ्याने हुबेहूब पुस्तकातल्या कथेप्रमाणे तीच युक्ती अंमलात आणली. या व्हिडीओत सुद्धा कावळा पाणी पिण्यासाठी एका छोट्या बादलीत खडे टाकताना दिसतो. त्यामुळे पाण्याची पातळी वर येताना दिसते आणि कावळा चोचीने पाणी पितो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या चतुर कावळ्याला बघून तुम्हाला तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आठवेल.

हेही वाचा : आजीच्या हातची गरमागरम भाकरी खातोय माकड; आजी पुरवतेय नातवंडाप्रमाणे लाड, व्हिडीओ होतोय व्हायरल

beautiffulgram_to या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही पुस्तकात ही गोष्ट वाचली असेल पण आता प्रत्यक्षात पाहा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय,”कदाचित या कावळ्याने तहानलेल्या कावळ्याची गोष्ट वाचली असावी” तर एका युजरने लिहिलेय,”शाळेची आठवण आली”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earlier you read the thirsty crow story in books but now you have seen it in real life video goes viral of clever crow ndj