आपण प्रत्येक वस्तू विशिष्ट किंमत देऊन विकत घेतो. मग ते पेन असो, घर असो किंवा जमीन. आजकाल तर लोकं चंद्रावरही जमीन विकत घेऊ लागले आहेत. जमीन विकत घेऊन लोक आपल्या भविष्याची सोय करून ठेवतात. परंतु, आपल्या पृथ्वीची एकूण किंमत काय असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या जगात अनेक मोठमोठे उद्योजक आहेत, अनेक श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे इतका पैसे आहे की आपण विचारही करू शकत नाही. परंतु जर पृथ्वी विकत घेता आली असती तर ती विकत कोण घेणार? आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पृथ्वीची किंमत किती असेल?
Treehugger.com वेबसाइटनुसार, संपूर्ण पृथ्वीची एकूण किंमत $5,000,000,000,000,000 म्हणजेच भारतीय चलनानुसार ३ लाख ७६ हजार २५८ खरब रुपये इतकी आहे. जमीन, नद्या, खनिजे आणि इतर मौल्यवान गोष्टींचा विचार करून ही किंमत ठरवण्यात आली आहे. जर कोणत्याही व्यक्तीकडे इतके पैसे असतील तर कदाचित ती व्यक्ती पृथ्वी विकत घेऊ शकते. परंतु कोणताही देश स्वतःला विकायला तयार होईल का?
ऐकावे ते नवलच… ५६ व्या वर्षी झाला स्पर्म डोनर; १० वर्षांमध्ये झाला १२९ मुलांचा बाप
सोशल मीडियावर सध्या ही बातमी प्रचंड व्हायरल होत असून ट्रेंडिंग देखील आहे. डेली मेलच्या बातमीनुसार, खगोलभौतिकशास्त्रज्ञ ग्रेग लॉफलिन यांनी ग्रहाचे वय, स्थिती, खनिजे, घटक यावर आधारित ही गणना केली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक ग्रेग लॉफलिन यांनी हे मूल्य एका विशेष सूत्रासह लागू केले आहे. यामध्ये पृथ्वीचा आकार, वस्तुमान, तापमान, वय आणि इतर अनेक घटक लक्षात घेऊन मोजणी करण्यात आली आहे.
ग्रेग यांच्यानुसार, मंगळाची किंमत फक्त १२ लाख २ हजार रुपये आहे. तर शुक्र ७० पैशांना खरेदी करता येईल. ग्रेगने म्हटले आहे की, आपली पृथ्वी खूप महाग आहे, ती कोणी विकत घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु लोकांना याबाबत माहिती असायला हवी.