जिथे मन जुळलेली असतात, विचारांची देवाणघेवाण नियमित सुरु असते तशी मैत्री आयुष्यभर पुरून उरते. मैत्री, दोस्ती, यारी, जिगरा… निःस्वार्थी आणि रक्तापलिकडील या नात्याची अशी कित्येक नाव आहेत. सुख-दुःखाच्या क्षणांमध्ये कायम सोबत असतात ते म्हणजे आपले मित्र. अशाच मित्रांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाळेतील वर्गमित्रांची ही अनोखी मैत्री पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल, हे मात्र नक्की.

कल्पना करा की, जर अचानक भूकंप आला तर…? सगळ्यात आधी तुम्ही स्वतःचा जीव वाचवाल. पण जेव्हा गोष्ट खऱ्या मैत्रीची असते तेव्हा आपसूक आपण आधी मित्र-मैत्रीणीचा जीव वाचवण्यासाठी पुढे येतो. मैत्री ही अशी भावना आहे ज्यात आपण स्वतःपेक्षा जास्त मित्र-मैत्रिणीचं सुख पाहतो. या गोष्टी तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपटात पाहिल्या असतील, पुस्तकात वाचल्या आहेत. इतकंच काय तर बड्या कवींनी देखील मैत्रीवर आपल्या कविता केल्या आहेत. पण हीच खरी मैत्री प्रत्यक्षात पहायला मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात शाळेतील वर्गमित्रांची यारी पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेत वर्ग सुरू आहेत. अनेक विद्यार्थी वर्गात अभ्यास करताना दिसत आहेत. या वर्गात एक दिव्यांग विद्यार्थी व्हीलचेअरवर बसलेला दिसतोय. त्याचवेळी अचानक भूकंपाचे हादरे बसतात. यात संपूर्ण शाळा हादरून जाते. हे पाहून वर्गातील सर्व विद्यार्थी इकडे तिकडे पळापळ करू लागतात. कुणी वर्गाबाहेर पळतंय, कुणी आपल्या जीव वाचवण्यासाठी इथे तिथे लपून बसतंय. त्याचवेळी एक अपंग विद्यार्थी त्याच्या बेंचवरच बसलेला दिसून येतोय. त्यांच्या अपंगत्वामुळे त्याला जागेवरून उठताही येत नव्हते. पण पुढे जे चित्र दिसतं ते पाहून तुमच्या जीवात जीव येईल.

आणखी वाचा : लग्नात वहिनीने दीरासोबत केला इतका जबरदस्त डान्स की, नवरी पाहातच राहिली…


सगळे विद्यार्थी वर्गाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना या अपंग विद्यार्थ्याचे वर्गमित्र त्याच्या जवळ येतात आणि जीवाची पर्वा न करता त्याला मदत करू लागतात. त्याला घेऊन ते वर्गमित्र वर्गाबाहेर पडतात. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. पण या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओ पाहून सारेच जण वर्गमित्रांच्या प्रेमात पडू लागले आहेत.

आणखी वाचा : चक्क पोपटाने महिलेला ‘आई’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली, दोघांमधील संभाषणाचा हा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बिहारमध्ये अचानक रस्त्यावर पडला माशांचा पाऊस, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ Erik Solheim नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ आता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसून येत आहेत. काही युजर्सनी तर त्यांच्या लहानपणीच्या वर्गमित्रांच्या आठवणीत भावना शेअर केल्या आहेत. तर काहींनी मैत्रीचं खरं उदाहरण असल्याचं सांगितलं आहे.

Story img Loader