देशातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कर्नाटकातील बेंगळुरूजवळील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी सलग दोन दिवस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आणि ७ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू मांडिकल आणि भोगपर्थी गावांजवळ होता. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर २.९ आणि ३ इतकी मोजली गेली. तर हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात सकाळी भूकंपाचे धक्के बसले. या वेळी भूकंपाची तीव्रता मागील धक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या सात दिवसांत दुस-यांदा ३ रिश्टर स्केलपेक्षा जास्त क्षमतेचा धक्का जाणवला. मात्र, यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.
भूकंपाच्या धक्क्यानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग अर्थक्वेक ट्रेण्ड होत आहे. नेटकरी मजेशीर कमेंट्स, मीम्स शेअर करत ट्वीट करत आहेत. तर अनेकांनी कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याने देवाचे आभार मानले आहेत.
करोनाचे नवनवे व्हेरियंट, मृतांचा वाढणारा आकडे, अर्थव्यवस्थेला बसलेली खिळ यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे, सोमवारी अमेरिकेतील कॅलिफोर्निया भूकंपाने हादरले. दुपारी बाराच्या सुमारास लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले असून त्याची तीव्रता ६.२ होती. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू सॅन फ्रान्सिस्को शहराच्या वायव्येस ३३७ किलोमीटर अंतरावर होता.