ब्रिटीशमधील इझीजेट (Easyjet) एअरलाईन अलीकडेच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. विमान उड्डाण करण्यापूर्वी या एअरलाइनने जबरदस्तीने १९ प्रवाशांना खाली उतरवले आहे. स्पेनच्या लॅन्झारोटे ते लिव्हरपूलला हे विमान जात होते. यावेळी विमानातील वजन जास्त झाल्याचे कारण देत या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. खराब हवामान आणि ओव्हरलोडमुळे विमान उड्डाणास २ तास उशीर झाला.
पायलटची प्रवाशांना स्वच्छेने ‘ऑप्ट आउट’ करण्याची विनंती
ब्रिटीश ऑनलाइन वृत्तपत्र ‘इंडिपेंडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ज्यामध्ये पायलट फ्लाइटला उशीर झाल्याबद्दल माहिती देत आहे. तसेच विमानाचे सुरक्षितरित्या टेक ऑफ करण्यासाठी १९ प्रवाशांना स्वत:हून विमानातून उतरण्यास सांगत आहे.
पायलटने प्रवाशांना सांगितले की, लॅन्झारोटे येथे अतिशय लहान धावपट्टी आहे यात विमानाच्या विरुद्ध दिशेने जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे खूप अवजड विमान धावपट्टीवर उतरवण्यात अडचण येत आहे. मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, माझ्यावर विश्वास ठेवा की, अशी परिस्थिती हातळण्याचा आम्हा दोघांना अनुभव आहे.
पायलट पुढे म्हणाला की, प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची आहे. सध्या वाऱ्याची दिशा लक्षात घेता विमान पुढे नेणे कठीण आहे. यामुळे आता पुढे काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असले? यावर आम्ही एक उपाय शोधला आहे जो प्रवाशांना सांगत आहोत. आम्ही ऑपरेशन टीमशी चर्चा करुन विमानातील वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पायलटचे हे बोलने ऐकून प्रवाशांना धक्काच बसला, पुढे पायलटने 19 प्रवाशांना स्वत:च्या मर्जीने खाली उतरण्याची विनंती केली. तसेच या प्रवाशांना ५०० युरो दिले जातील असे सांगितले. अनेक प्रवासी या निर्णयामुळे खूश नव्हते. तरीही १९ प्रवाशांना खाली उतरावे लागते.
भारतीय रेल्वे जवानांच्या ताकदीला सलाम! चक्क बंद ट्रेनला धक्का देत केले सुरु; Viral Video एकदा पाहाच
यावर इझीजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, अखेर १९ प्रवाशांनी स्वत:च्या इच्छेने विमानातून खाली उतरण्यास सहमती दर्शवली. अनेकदा सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विमान कंपन्यांना वजन प्रतिबंध लागू होतात. अशा परिस्थितीत अनेकदा असे निर्णय घेतले जातात. विमानाने वजनाची मर्यादा ओलांडल्यास आम्ही प्रवाशांना स्वेच्छेने पैसे न देता नंतरच्या विमानातून जाण्यास सांगतो, जे या प्रसंगी देखील झाले. असे करणाऱ्यांना नियमानुसार भरपाई दिली जाते. कारण प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही विमान कंपनीची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.