Mumbai Viral Video : मायानगरी मुंबईत अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. पण, यातील अनेकांकडे मुंबईत हक्काचे घर, माणसं नसल्याने त्यांना नातेवाईक किंवा भाड्याच्या खोलीत दिवस काढावे लागतात. अशी लोकं मुंबईतील वडापाव, इडली, डोसा खाऊन आपले दिवस काढतात. यामुळे मुंबईत सकाळच्यावेळी अनेक ठिकाणी इडली, मेदूवडा, डोसा, उत्तपा, वडापाव घेऊन फिरणारे फेरीवाले दिसतात. ज्यांच्याकडे अगदी २० रुपयांत पोटभर इडली, मेदूवडा प्लेट मिळते.

पण, हे पदार्थ विकताना फेरीवाले स्वच्छतेची किती काळजी घेतात? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, कारण सध्या सोशल मीडियावर मुंबईत इडली, मेदूवडा विकणाऱ्या एका फेरीवाल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की, हे लोक कशाप्रकारे ग्राहकांच्या जीवाशी खेळतात.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका फेरीवाल्याने इडली, मेदूवड्याचा मोठा टोप एका सार्वजनिक शौचालयात ठेवलाय आणि तो तिथेच लघूशंका करण्यासाठी गेला. मुंबईतील सार्वजनिक शौचालयांची अवस्था पाहिल्यास अतिशय घाणेरडा वास, त्यात लोकांची सतत ये-जा, इतकेच नाही तर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी येणारे अनेक लोकही या सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात.

अशा गलिच्छ प्रकारच्या शौचालयात फेरीवाल्याने ग्राहकांना विकण्यासाठी ठेवलेल्या इडली, मेदूवड्याचा टोप ठेवला होता आणि तोच टोप लघूशंका करून आल्यानंतर पुन्हा घेऊन निघाला. यावेळी त्याने हात स्वच्छ धुतलेत की नाही, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय.

mumbai viral video

हा व्हिडीओ koliyachebol’s नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात एक तरुण सांगतोय की, मुंबई सेंट्रलला काही कामानिमित्त तो गेला असताना एका सार्वजनिक शौचालयात फेरीवाल्याने ठेवलेला इडलीचा टोप त्याला दिसला, जो पाहून त्यालाही धक्का बसला. यानंतर काही मिनिटांत तो फेरीवाला शौचालयातून बाहेर आला आणि पुन्हा रस्त्यावर जाऊन इडल्या विकू लागला.

Read More News On Trending : मद्यधुंद महिलेचे संतापजनक कृत्य, ड्रायव्हरने बस न थांबवल्याने कंडक्टरबरोबर केले असे काही की, Video पाहून बसेल धक्का

यातून त्याने लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला की, फेरीवाल्यांकडून नाश्ता करताना तो तुमच्या रिस्कवर करा. कारण मुंबईत असे अनेक इडली, मेदूवडा विकणारे फेरीवाले गल्लोगल्ली, रस्त्यांवर फिरत असतात. पण, ते हे पदार्थ कुठे बनवतात, बनवताना स्वच्छता पाळतात का? किंवा विकताना स्वच्छतेची काळजी घेतात की नाही याची कोणतीच माहिती आपल्याकडे नसते. तरीही मुंबईतील अनेक लोक सकाळच्या वेळी अशा फेरीवाल्यांकडे नाश्ता करताना दिसतात. त्यांच्याकडील इडली, मेदूवडा चवीने खाताना दिसतात.

Story img Loader