आपल्या देशात समोसे इतके प्रसिद्ध आहेत की आपल्याकडे पाहुणे येणार असतील तर आपण आवर्जून समोसे मागवतो. आपल्या देशात असे कोणतेही ठिकाण नसेल जिथे आपल्याला समोसे मिळणार नाहीत आणि क्वचितच असे लोक असतील ज्यांना समोसे आवडत नसतील. परंतु असे एक ठिकाण आहे जिथे लोकांना समोसे खाण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्ही चुकूनही समोसे खाऊ शकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमालिया हा असा एक देश आहे, जिथे तुम्ही चुकूनही समोसे खाऊ शकत नाहीत. वास्तविक, येथे समोशाच्या आकारामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. समोस्याचा आकार त्रिकोणी असतो. सोमालियामध्ये एक कट्टरतावादी लोकांचा गट आहे जो असे मानतो की समोशाचे त्रिकोणी रूप ख्रिश्चन समुदायाच्या जवळ आहे. ते त्यांच्या पवित्र चिन्हासोबत मेळ खाते. या चिन्हाचा ते आदर करतात, याच कारणामुळे सोमालियामध्ये समोशावर बंदी घालण्यात आली आहे.

Ukraine War: रशियन मांजरांच्या विदेशगमनास बंदी; ‘हे’ आहे कारण

समोसे बनवणे, विकत घेणे आणि खाणे यासाठी सोमालियन लोक शिक्षेस पात्र ठरतात. काही अहवालांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की येथे उपासमारीमुळे मेलेल्या प्राण्यांचे मांस समोसामध्ये वापरण्यात आले होते, त्यामुळे सोमालियामध्ये समोशावर बंदी आहे. याशिवाय, सोमालियामध्ये समोसे हे आक्रमकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

संसदेत बसून महिला खासदार करत होत्या ऑनलाइन शॉपिंग; ‘या’ वस्तू घेतल्याची सोशल मीडियावर चर्चा

परंतु संपूर्ण दक्षिण आशियामध्ये समोसे खूप लोकप्रिय आहेत. मैद्याच्या पिठाच्या पुरीमध्ये बटाट्याची मसालेदार भाजी भरून हा चविष्ट पदार्थ तयार केला जातो. खाताना यासोबत चटणी दिली जाते. असे मानले जाते की समोशाची उत्पत्ती उत्तर भारतात झाली. यानंतर ते भारत, पाकिस्तान, बांगलादेशमधून संपूर्ण दक्षिण आशियात लोकप्रिय झाले. १६व्या शतकातील मुघल काळातील ‘ऐने अकबरी’ या दस्तऐवजातही समोशांचा उल्लेख आढळतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating samosa is banned here you will be shocked after hearing strange reasons pvp