मराठी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकार अनेक प्रयत्न करत आहे पण तरीही अनेक लोक मराठी शाळेऐवजी इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेश घेताना दिसत आहे त्यामुळे नव्या पिढीला मराठी भाषेचा विसर पडत आहे. पण अजूनही काही लोक असे आहेत जे मराठी भाषेला महत्त्व देतात आणि आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवतात. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मुलांना लहानपणीपासूनच मराठी भाषेची गोडी लावली तरच मराठी भाषेचे संवर्धन होईल. अशाच विचार करणाऱ्या पालकांनी आपल्या मुलीचा मराठी भाषेत कविता म्हणताना व्हिडीओ शेअर केला आहे आणि मराठी भाषेतून लोकांचे संवर्धन करावे असा संदेश दिसत आहे.

इंस्टाग्रामवर dreamgirl_shraavi नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकली गोंडस आवाजात मराठी भाषेत कवित म्हणत आहे. चिमुकलीने “म्याँव म्याँव म्याँव….येऊ का घरात? “ही कविता म्हटली आहे.

Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Uday Samant request to the central government regarding Marathi language
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व लाभ द्या; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची केंद्र सरकारला विनंती
What Uday Samant Said?
Uday Samant : उदय सामंत यांच्या हाती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची अधिसूचना; म्हणाले, “आज अत्यंत आनंदाचा दिवस..”
Rambhau Mhalgi lecture series starts on Wednesday January 8
ठाण्यात उद्यापासून रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेला सुरूवात
chandrika new song sonu nigam sangeet manapman
सोनू निगमने मराठी गाण्याने केली नवीन वर्षाची सुरुवात, ‘संगीत मानापमान’ मध्ये गायलंय ‘चंद्रिका’ गाणं; पाहा व्हिडीओ
devendra fadnavis on pune
Devendra Fadnavis Video: “पुणे बुद्धिमान लोकांचं शहर आणि बुद्धिमान लोकांना…”, देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये केलेलं विधान चर्चेत!

“म्याँव म्याँव म्याँव….येऊ का घरात?
कोण आहे तिकडे स्वयंपाक घरात!
अगं बाई ह्या तर आजीबाई
मग मी घरात येत नाही
म्याँव म्याँव म्याँव….येऊ का घरात?
अगं बाई ह्या तर मालकीन बाई
दाराआड लपायला हरकत नाही
म्याँव म्याँव म्याँव….येऊ का घरात?
अगं बाई ह्या हे तर ताई आणि दादा
घरभर फिरायला हरकत नाही”

चिमुकलीने आपल्या गोंडस आवाजात कविता म्हटली आहे.

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “मराठी शाळा हव्या. शिक्षणाची सुरवात मातृभाषेतूनच व्हायला हवी. शिक्षणात मातृभाषेमुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. मातृभाषा ही संस्काराचा आणि संस्कृतीचा मानबिंदू आहे. जितक्या सहजतेने मूल मातृभाषेतून शिकते तितक्या सहजतेने इतर भाषेत शिकत नाही करण ती रोजची बोली भाषा नाही म्हणून मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण आहे. मराठी शाळा हव्या, शिक्षण सहज होऊन जातं आणि अभ्यास आवडायला लागतो कारण तो आपल्या मातृभाषेत असतो. म्हणून लगेच समजतो, घोकंपट्टी करायची गरज भासत नाही. एकदा का अभ्यासात रुची आली की, इतर कोणतीही भाषा समजायला आणि शिकायला वेळ लागत नाही. अभ्यासाचा कंटाळा येत नाही कारण आपल्या भाषेत शिक्षण झाल्यामुळे पाया खूप मजबूत झालेला असतो. जेव्हा सुरवातीला प्रश्न पडतात ते विचारायला भाषेचं बंधन नसतं आणि समजावल्यावर ते अगदी सहज समजतं. शिक्षणात आणि जगण्यात आनंद असेल तर त्या निरागस बालपणाला अर्थ आहे.”

हेही वाचा – पुण्यात पुन्हा अपघात! भरधाव वेगाने येणारी कार दुभाजक तोडून गरवारे सर्कलवरुन खाली कोसळली, Video Viral

व्हिडीओवर कमेंट करून अनेकांनी चिमुकलीचं कौतूक केले आहे. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी लिहले की, “किती गोड आहे.” दुसरा म्हणाला, “चिमणी किती गोड आहेस गं तू”

“खूपच गोड…आणि मराठी शाळेत मुलीला प्रवेश घेतलात खूप अभिनंदन तुमचे”असे तिसऱ्याने लिहिले.

“मातृभाषेतून आपल्या मेंदूची आकलन क्षमता वाढते,असे मला वाटते असेही एकाने सांगितले.

Story img Loader