Egg Pani Puri Recipe Viral : पाणी पुरीचे नाव काढले तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. उकडलेले वाटाणे, बटाटा, तिखट, गोड पाणी आणि लहानश्या गोल पुऱ्यांपासून बनलेली पाणीपुरी प्रत्येकाने एकदा तरी खाल्लीच असेल. हल्ली बाजारात वेगवेगळ्या फ्लेव्हर्सच्या पाणी पुरी चाखायला मिळतात. पण यात अगदी साध्या पद्धतीने बनवलेली पाणी पुरीचं अनेकांना आवडते. पाणी पुरीची रेसिपी साधी सरळ आणि लोकप्रिय असतानाही काही दुकानदार त्यावर भलतेच प्रयोग करताना दिसत आहे. अलीकडे चॉकलेट पाणी पुरी, डोसा पाणी पुरी, मॅगी पाणी पुरी, आईस्क्रिम पाणी पुरी अशा अजब-गजब पाणी पुरीच्या व्हिडीओ व्हायरल झाल्या होत्या. यात आता आणी एक हटके पाणी पुरी रेसिपीची भर पडली आहे. जी ‘अंडा पाणी पुरी’ नावाने फेमस होत आहे. यात अंड्याला चक्क पाणी पुरीचा तडका देण्यात आला आहे. त्यामुळे अनेकजण पाणी पुरीचा हा नॉनव्हेज व्हर्जन असल्याचे म्हणत आहेत. विशेष म्हणजे यात पाणी पुरीसाठी वापरले जाणारे कोणतेही पदार्थ नसताही हा पदार्थ ‘अंडा पाणी पुरी’ नावाने प्रसिद्ध होत आहे.

कशी बनवली जाते ही अंडा पाणी पुरी ?

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने सर्वप्रथम अंडी उकडवून घेतली. अंड्यातील पिवळा भाग बाजूला काढत त्यामध्ये टोमॅटो सॉस आणि फ्रेश क्रिम टाकली. यानंतर मोठ्याप्रमाणात चीज, स्पेशल मसाले आणि कोथिंबीर टाकून डिश सर्व्ह केली. अशाप्रकारे तयार झाली अंडा पाणी पुरी. पाणी पुरीची ही नॉनव्हेज रेसिपी surti_lalo नावाच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आली आहे.

leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Farmer Viral Video
शेतकऱ्यांनो तुम्हीही कांद्याचं पिकं घेतलंय का? वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्
Chennai mans scooter-raft ride with grandchildren in flooded complex Viral video
“हे फक्त आजोबाच करू शकतात!” चक्क पुराच्या पाण्यात नातवंडाना बोटीत बसवून फिरवले, Viral Videoपाहून पोट धरून हसाल
benefits of custard apple cultivation
लोकशिवार : फायदेशीर सीताफळ
bush migratory birds have made their presence
अकोला : विदेशी ‘पाहुण्यां’ची अद्याप प्रतीक्षाच, ‘झुडुपी’ची हजेरी…
Aloo Palak Paratha recipe
हिवाळ्यात असा बनवा आलू पालक पराठा, रेसिपी जाणून घ्या; VIDEO होतोय व्हायरल
Egg Korma Recipe
Egg Korma Recipe: नॉनव्हेज प्रेमींना हमखास आवडेल अशी झणझणीत ‘अंडा कोरमा रेसिपी’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

काकूंचा स्वॅगचं न्यारा! चक्क बाईकवर बांधलेल्या गोणीवर बसून केला प्रवास, जुगाड Video पाहून युजर्स म्हणाले, हा भारत…

हा व्हिडीओ आत्तापर्यंत २२ लाखांपेक्षा अधिक युजर्सनी पाहिला आहे. आत्तापर्यंत आपण पाणी पुरीचे व्हेज प्रकार पाहिले होते पण आता या नॉनव्हेज पाणीपुरीच्या रेसिपीवर आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण यात ना पाणी पुरीचे पाणी आहे ना पुरी, तरीही हा पदार्थ ‘अंडा पाणी पुरी’ नावाखाली विकला जात आहे. त्यामुळे काही युजर्सनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader