Egg Pani Puri Recipe Viral : पाणी पुरीचे नाव काढले तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. उकडलेले वाटाणे, बटाटा, तिखट, गोड पाणी आणि लहानश्या गोल पुऱ्यांपासून बनलेली पाणीपुरी प्रत्येकाने एकदा तरी खाल्लीच असेल. हल्ली बाजारात वेगवेगळ्या फ्लेव्हर्सच्या पाणी पुरी चाखायला मिळतात. पण यात अगदी साध्या पद्धतीने बनवलेली पाणी पुरीचं अनेकांना आवडते. पाणी पुरीची रेसिपी साधी सरळ आणि लोकप्रिय असतानाही काही दुकानदार त्यावर भलतेच प्रयोग करताना दिसत आहे. अलीकडे चॉकलेट पाणी पुरी, डोसा पाणी पुरी, मॅगी पाणी पुरी, आईस्क्रिम पाणी पुरी अशा अजब-गजब पाणी पुरीच्या व्हिडीओ व्हायरल झाल्या होत्या. यात आता आणी एक हटके पाणी पुरी रेसिपीची भर पडली आहे. जी ‘अंडा पाणी पुरी’ नावाने फेमस होत आहे. यात अंड्याला चक्क पाणी पुरीचा तडका देण्यात आला आहे. त्यामुळे अनेकजण पाणी पुरीचा हा नॉनव्हेज व्हर्जन असल्याचे म्हणत आहेत. विशेष म्हणजे यात पाणी पुरीसाठी वापरले जाणारे कोणतेही पदार्थ नसताही हा पदार्थ ‘अंडा पाणी पुरी’ नावाने प्रसिद्ध होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा