महाराष्ट्रातील नागपूर येथील एका व्यक्तीला स्विगीने असा केक दिला, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. नागपूरातील कपिल वासनिक याने शहरातील लोकप्रिय बेकरी शॉपमधून स्विगीच्या माध्यमातून केक ऑर्डर केला. पण जेव्हा हा केक कपिलच्या घरी डिलिव्हर झाला तेव्हा त्या केकने त्याला आश्चर्यचकित केले. कपिलने जेव्हा ही घटना ट्विटरवर शेअर केली, तेव्हा युजर्सनाही आपले हसू आवरले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केकची ऑर्डर देताना कपिलने “केकमध्ये अंडे आहे का?” असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर केकच्यावर लिहून पाठवले होते. हे उत्तर आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. समजा तुम्ही एक केक ऑर्डर केला आहे आहे आणि त्यावर लिहलंय, ‘तुमच्या केकमध्ये अंडे आहे.’ तर तुम्हाला काय वाटेल? असाच काहीसा प्रकार नागपूरच्या कपिलसोबत घडला आहे.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

केकचा फोटो ट्विटरवर शेअर करत कपिल वासनिकने लिहिले की, “मी नागपुरातील एका प्रसिद्ध बेकरीतून स्विगीद्वारे केक ऑर्डर केला. ऑर्डर तपशीलात मी लिहिले, “कृपया केकमध्ये अंडी आहेत की नाही ते सांगा…” पण ऑर्डर आल्यानंतर केक पाहिल्यावर मी अवाक झालो. खरे तर स्विगी अ‍ॅपवरच उत्तर द्यायला हवे होते, मात्र याचे उत्तर बेकरीने केकवरच लिहून दिले.

केकवर लिहिले होते, “या केकमध्ये अंडे आहे. (Contains Egg)” कपिल वासनिकने ही घटना ट्विटरवर शेअर केली आन आपल्या ट्विटमध्ये #Swiggy चा वापर केला आहे. काही वेळातच हे ट्विट व्हायरल झाले. कपिलच्या ट्विटला आतापर्यंत २०.२ हजार रिट्विट्स, १८४.६ हजार लाईक्स आणि ३,०८२ हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

हायवेवरच्या फलकाला लटकून केली Exercise; Viral Video पाहून नेटकरी झाले हैराण

स्विगीने आपल्या ग्राहकांच्या समाधानासाठी या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. स्विगीने ग्राहकांची माफी मागितली आणि म्हटले की, “रेस्टॉरंट भागीदार त्यांच्या सूचना समजण्यात अयशस्वी ठरले.” कपिलच्या ट्विटला प्रत्युत्तर देत स्विगीने लिहिले की, “आम्हाला या प्रकरणाची बारकाईने चौकशी करण्यास वेळ द्या. पुढील सहाय्यासाठी कृपया ऑर्डर आयडी शेअर करा.”

विमानतळावरील कन्व्हेयर बेल्टवर पेपरमध्ये गुंडाळलेला मृतदेह?; Viral Video पाहून नेटकरी हैराण

सोशल मीडियावर कपिलचे हे ट्विट तुफान व्हायरल झाले असून यावर अनेक युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा फोटो पाहून लोकांना आपले हसू आवरता येत नाही आहे. एक व्यक्ती म्हणाला, ‘यार, माफ करा पण हे खरोखर मजेदार आहे. ह्याची बातमी व्हायला हवी…’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, “हे आश्चर्यकारक आहे. खरंतर आपण रेस्टॉरंट माणसाला पूर्णपणे दोष देऊ शकत नाही. त्याने तुमचे म्हणणे खूप गांभीर्याने घेतले आहे. त्याने तुमची सूचना केकवर शब्दशः लिहिली आहे.” अनेकांनी, बेकरला त्यांच्या सूचना समजू न शकल्यामुळे त्यांना अशाच अनुभवातून कसे जावे लागले हेही सांगितले. एका यूजरने लिहिले की, “तुम्ही बेकरी शॉपच्या लोकांना का टॅग केले नाही? अंड्याचे अंडे… आणि व्हेजच व्हेज झालं असतं.”