आजकाल सोशल मीडियावर एकापेक्षा एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये दुचाकी चालकांशी संबंधित अनेक व्हिडीओ असतात. ज्यामध्ये काही दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाहीत, तर काहीजण सिग्नल तोडून गाड्या पळवताना दिसतात. त्यामुळे असे लोक वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नसल्याचं आपणाला पाहायला मिळतं.
मात्र, सीसीटीव्ही कॅमेरा आणि सोशल मीडियाच्या जमान्यात अशा लोकांची कृत्य कॅमेऱ्यात कैद होतात आणि त्यांना पुन्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागतं. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रील बनवण्यासाठी विचित्र आणि धोकादायक स्टंट करणाऱ्या मुलांचा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही. कारण या व्हिडीओतील स्कुटीवर एक दोन नव्हे तर तब्बल आठ मुलं बसल्याचं दिसत आहे.
हेही पाहा- धीरेंद्र कृष्ण महाराजांचा नवा अवतार आला समोर; व्हायरल Video पाहताच समर्थक म्हणाले, “गुरुदेव पुन्हा…”
या व्हायरल व्हिडिओमध्ये ८ ते ९ मुले स्कूटीवरून प्रवास करताना दिसत आहेत. ती मुल ज्या पद्धतीने स्कुटीवर बसली आहेत ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिवाय असा प्रवास करणं म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारख असल्याचं लोक म्हणत आहेत. कारण या मुलांनी स्कुटीच्या सीटचा मागच्या भागावर एकमेकांच्या हाताच्या साह्याने लटकताना दिसत आहेत. तर या मुलांच्या विचित्र कृत्याचा व्हिडीओ त्यांच्या मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही पाहा- तरुणाने चक्क शेणापासून कमावले लाखो रुपये, चपलांसह अनेक सजावटीच्या वस्तू बनवण्याचा सुरु केला व्यवसाय
या स्कुटीवरुन जाणाऱ्या या मुलांना पाहताच रेकॉर्ड करणारा त्यांना ‘अरे भावांनो हे कसं केलं, तुमच्यात खूप टॅलेंट आहे,’ असं म्हणतो, त्यावर स्कुटीवर बसलेल्यांपैकी एकजण ‘अरे भावा…हा व्हिडिओ सोशल मीडियावर सोडू नको, नाहीतर चालान कट करतील,’ असं म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ झारखंडमधील असल्याचा दावा केला जात आहे. कारण स्कूटीच्या नंबर प्लेटवर झारखंडची नोंदणी दिसत आहे. दरम्यान व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. काही लोक या स्कुटीचालकासह मुलांवर कारवाई करा म्हणत आहेत. तर काही तरुणांनी मात्र या स्कुटीचालकाच्या टॅलेंटच कौतुक केलं आहे.