पडोसन या चित्रपटाचे नुसते नाव घेतले तरीही आपल्या डोळ्यासमोर येते ते त्यामधील गाजलेले ‘एक चतुर नार….’ हे गाजलेले गाणे. बॉलिवूडच्या जुन्या गाण्यांच्या यादीतले हे एक प्रसिद्ध गाणे आहे. या गाण्याबाबतची एक गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसू शकतो. १९६८ मध्ये आलेल्या ‘पडोसन’ या प्रसिद्ध चित्रपटातील हे गाणे गायक किशोर कुमार यांनी गायले आहे. त्यामुळे या गाण्याचे मूळ गायक किशोर कुमार आणि मन्ना डे हेच हेच आहेत असा जवळपास सर्व संगीतप्रेमींचा समज आहे. पण प्रत्यक्षात तसे नसून या गाण्याचे मूळ गायक वेगळेच आहेत. हे मूळ गाणे किशोर कुमार यांचे नसून ते त्याचे मोठे भाऊ अशोक कुमार यांनी गायलेले आहे. १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झूला’ या चित्रपटातील हे गाणे असून ते अशोक कुमार यांनी गायल्याचे नुकतेच समोर आले आहे.

विशेष म्हणजे झूला या चित्रपटातील हे गाणे यु-ट्यूबवर उपलब्ध आहे. याची एक शॉर्ट क्लिप मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र जैन यांनी नुकतीच शेअर केली. जैन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही क्लिप शेअर केल्याने ती अतिशय कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यावर असंख्य लोकांनी आश्चर्य व्यक्त केले असून या गाण्याच्या मूळ गायकांबाबत आपल्याला माहितीच नव्हते असेही त्यांनी म्हटले आहे. या दोन्ही गाण्यांची चालही बऱ्यापौकी सारखीच आहे. इतकेच नाही तर दोन्ही गाण्यांच्या संगीतात आणि शब्दरचनेत नात्र बऱ्याच प्रमाणात फरक असल्याचे ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. झूला हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असून जैन यांनी शेअर केलेला व्हिडियो ३३ हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे.