केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षेला बसलेल्या एका उमेदवार तरुणीला, उशिरा आल्यामुळे गुरुग्राममधील परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर तिच्या पालकांचा धीर सुटला आणि त्यांना रडू कोसळले. पालकांनी रडतानाच व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, आकांक्षाची आई बेशुद्ध अवस्थेत तिचे वडील रडताना दिसत आहेत. पापा, प्लीज पाणी पिऊन शांत व्हा. तुम्ही असे का वागत आहात? मी पुढच्या वर्षी परीक्षेला बसेन. ही फार मोठी गोष्ट नाही,”अस म्हणत तरुणी आपल्या वडीलांना समजावत आहे.
“एक वर्ष वाया गेले बाबु आपले”, वडील म्हणतात. त्यावर ती उत्तर देते, “ही काही मोठी गोष्ट नाही. मी अजून लहान आहे”
वडील रडताना आणि शाळेच्या अधिकाऱ्यांना शिव्या देताना दिसतात. वडील आणि मुलगी नंतर आईला मनण्याचा प्रयत्न करतात.
व्हिडीओ शेअर करताना X युजर साक्षीने लिहिले, “हृदयद्रावक व्हिडिओ. आज यूपीएससी प्रिलिम्स परीक्षेसाठी आपल्या मुलीसह आलेल्या पालकांची स्थिती, कारण त्यांच्या मुलीला उशीर झाल्यामुळे परवानगी मिळाली नाही. परीक्षा सकाळी ९:३० वाजता सुरू होते आणि ते सकाळी 9 वाजता गेटवर होते पण त्यांना एस.डी.च्या प्राचार्यांनी प्रवेश दिला नाही. आदर्श विद्यालय, सेक्टर ४७, गुरुग्राम.
हेही वाचा – VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर आला सैनिक मुलगा आईसमोर अन् अश्रूंचा बांध फुटला, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक
रविवारी शेअर केलेल्या व्हिडिओला १,९२,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले कारण अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सहानुभूती व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने लिहिले की, “मी जरी काल परीक्षेला गेलो होतो, त्यांनी मला सकाळी ९ नंतर प्रवेश दिला. परंतु काही महाविद्यालये, ते सध्याच्या प्राचार्यांच्या प्रकारावर अवलंबून असतात. त्यांनी सकाळी ९.२५ पर्यंत उमेदवारांना परवानगी दिली आणि नंतर गेट बंद केले. तो दयाळू होता. ” दुसऱ्याने कमेंट केली की, “या स्थितीत त्याच्या मुलीचा आदर करा.”
हेही वाचा – धक्कादायक! कॉलेज कॅन्टीनच्या जेवणात सापडले सापाचे तुकडे, विद्यार्थ्यांचा दावा; १० ते १५ जण रुग्णालयात दाखल
“एक चांगली UPSC परीक्षार्थी, तिच्या आईला रडताना पाहून तिला तिने धीर सोडला नाही पण रडणाऱ्या काकूंबद्दल वाईट वाटले,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.
UPSC प्रिलिम्स २०२४ दोन शिफ्टमध्ये – सकाळ आणि दुपार – रविवारी आयोजित करण्यात आली होती. जीएस पेपर १ साठी सकाळची शिफ्ट सकाळी ९.३० वाजता सुरू झाली, तर जीएस पेपर २ (CSAT) साठी दुपारची शिफ्ट दुपारी २.३० वाजता सुरू झाली.