“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात अल्पवाधित लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील आपल्या पत्नीसहीत नुकतेच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. आपल्या गावरान आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे मागील काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झालेल्या शहाजीबापूंनी या कार्यक्रमात अगदी आपल्या पत्नीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत उखाणा घेतल्याचं पहायला मिळालं. या उखाण्याला कार्यक्रमाचे सुत्रसंचालक निलेश साबळेंपासून ते स्वप्नील जोशीनेही टाळ्या वाजवत दाद दिली. विशेष म्हणजे हा उखाणा ऐकून शहाजीबापूंच्या पत्नीही हसून लाजल्याचं पहायला मिळालं.
नक्की पाहा >> Photos: “पाया पडतो, भांडू नको…”; स्वत:च्याच लग्नात शहाजीबापूंनी पत्नीला सोन्याऐवजी दिलेले पितळ्याचे दागिने; कारण…
राजकीय आखाड्यामध्ये एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या राजकारण्यांची वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न चला हवा येऊ द्याच्या आजच्या म्हणजेच १८ जूलैच्या भागामध्ये पहायला मिळणार आहे. या विशेष भागाच्या जाहिरातीमध्ये शहाजीबापू पाटील यांच्यासोबतच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्या पतीसोबत सहभागी झाल्याचं दिसत आहे. झाडी, डोंगार, हाटीलमुळे लोकप्रिय झालेल्या शहाजीबापू पाटील यांच्या याच संवादाच्या अवतीभोवती थुकरटवाडीतील स्कीट रचण्यात आल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतंय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा