आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल; पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली, तर आता अनेक जण प्रत्यक्षात प्रसिद्धीसाठी, सोशल मीडियावरील काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करतात. हे स्टंट पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो.
अनेकदा असे धोकादायक स्टंट तरुण जास्त प्रमाणात करतात. बाईक वेडीवाकडी चालवणं, कोणत्या उंच इमारतीवरून उडी मारणं, भररस्त्यात स्टंट करणं असे तरुणांचे अनेक व्हिडीओ आपण पाहिलेच असतील; पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात कोणताही तरुण नाही, तर एक आजोबा धक्कादायक स्टंट करताना दिसत आहेत. एक आजोबा चालत्या बाईकवर सिलेंडरवर बसून धोकादायक स्टंट करत आहेत.
व्हायरल व्हिडीओ
आजोबांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कपाळावर हात माराल. या व्हिडीओमध्ये आजोबा जीवघेणा स्टंट करताना दिसतायत. आजोबा बाईक चालवताना दिसत आहेत, पण सीटवर न बसता ते सिलेंडरवर बसून बाईक चालवत आहेत. बाईकच हॅंडल हाताने न पकडता आजोबा बाईकचा बॅलन्स आपल्या पायाने कंट्रोल करत आहेत. चालत्या बाईकवर हा जीवघेणा स्टंट करत असताना हे आजोबा अगदी हसत खेळत सिलेंडरवर बसलेले दिसतायत.
हा व्हिडीओ @fact_by_pratham या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला बुढापे मे ये हाल है तो जवानी मे क्या क्या गुल खिलाए होंगे चाचावे असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला १.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
आजोबांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळे व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तारुण्याचे स्वप्न उतारवयात पूर्ण झालं” तर दुसऱ्याने “यांच्या अशा वागण्यानेच गॅस महाग झाला आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “आजोबा आयुष्य जगले आहेत, आता त्यांना मृत्यूची भीती नाही.” तर “याला म्हणतात मरणाशी खेळणं” अशी कमेंट एकाने केली.