Elder man speaks in english video: गेल्या अनेक काळापासून इंग्रजी भाषेचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आधी फक्त आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या पालकांची मुलं इंग्रजी शाळेत जात असत. पण आता सगळेच इंग्रजी शाळेत शिकू लागले आहेत. आधी इतक्या सोयी-सुविधा नव्हत्या पण आता थोड्या थोड्या अंतरावर इंग्रजी शाळा आहेत, क्लासेस आहेत.

आताची मुलं ज्याप्रकारे इंग्रजी बोलतात तसंच एखाद्या गावाकडील आजोबांनी इंग्रजीमध्ये संवाद केला तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल ना. सध्या असाच प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायपल होतोय, यात एका आजोबांनी इंग्रजीमध्ये आपली ओळख करून दिली आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगितली.

Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Girl's celebrated father's birthday in a unique way
‘प्रत्येकाच्या पदरी एक तरी लेक असावी…’, चिमुकल्यांनी बाबांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही भाग्यवान वडील”
Old man plays drums at wedding emotional video viral on social Media
VIDEO: “गरिबी आणि जबाबदारी वय बघत नसते” या वयात आजोबांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
an old man in 90s do exercise
VIDEO : नव्वदीतही आजोबा करताहेत व्यायाम! तरुणांनो, मग तुम्ही का कारणं देता? Video Viral
grandpa providing copy to Grandchild During Exam Goes Viral
VIDEO : परीक्षा सुरू असताना नातवाला कॉपी पुरवत होते आजोबा, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन

आजोबांचं इंग्रजी जगात भारी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आजोबांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा काही विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना दिसले. पण ते मराठीतून न बोलता इंग्रजीमधून त्यांच्याशी संवाद साधत होते. शर्ट पॅन्ट आणि डोक्यावर सफेद टोपी असा पेहराव असलेले हे आजोबा चक्क इंग्रजीमध्ये बोलायला लागले हे ऐकताच सगळेच चकित झाले.

हेही वाचा… चालत्या रिक्षातून महिलेने मारली उडी! दारूच्या नशेत ड्रायव्हरने चुकीच्या ठिकाणी नेले अन्…; संतापजनक पोस्ट व्हायरल

सुरूवातीला त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. मग त्यांनी ते इंडियन आर्मीमध्ये होते असा उल्लेख केला. आता मी इथे फिरण्यासाठी आलो आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या शिक्षणाविषयी थोडी माहिती दिली. धाडधाड इंग्रजी बोलून झाल्यावर आजोंबानी विद्यार्थ्यांना कसं वाटलं माझं इंग्रजी असाही प्रश्न विचारला.

आजोबांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @all_dyp_family_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “शिक्षण घे भावा ते कधीचं तुला उपाशी पोटी झोपू देणार नाही..” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

पुढे या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “आपल्या कॅालेज मध्ये हे काका आले होते त्यावेक्ळी त्यांना सहज विचारलं व कीही मुलं त्यांना अशिक्षित आहेत म्हणून काही तरी म्हटले त्यावेळी त्यांनी त्यांचा परीचय करून दिला -कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालूका आणि त्यात बस्तरवाड हे गाव व अर्जुन कोळी त्यांचं नाव” तर पुढे “शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे जो कोणी पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही..!” असंही लिहण्यात आले आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.४ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… जबाबदारी बालपणही हिरावून घेते! लहान मुलाच्या संघर्षाचा ‘हा’ VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मराठी माणूस कोणत्याच काम मध्ये कमी नाही” तर दुसऱ्याने “मराठी माणसाचा नाद करायचा नाय” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “जे पुस्तकात सापडतात ते इतिहास घडवतात… म्हणून कोणाच्या साध्या स्वभावाला कमी समजायचं नाही”

Story img Loader