कधीही चोरू नका, खोटं बोलू नका असं आपल्या लहानपणी आजी आजोबा वेगवेगळ्या गोष्टींमधून शिकवलं असेल. मोठ्यांचा आदर करा, त्यांचं नेहमी ऐकत जा, असे सल्लेही आपल्याला दिले असतील. पण जर आजी आजोबाच हे चूकीची कामे करत असतील तर? होय. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात चक्क आजी आजोबा एका मॉलमध्ये चोरी करताना दिसले. यावेळी कुणीतरी त्यांना चोरी करताना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं. याचा व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. मॉलमध्ये चोरी करणाऱ्या या आजी-आजोबांची कशी पोलखोल झाली? पाहूयात…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आजी-आजोबा मॉलमधून दुसरं तिसरं काही नाही तर चक्क एक रोपटं चोरताना दिसत आहेत. सुरूवातीला हे दोघेही इकडे तिकडे पाहताना दिसतात. आपल्याकडे आजुबाजूला कुणी पाहत तर नाही ना, याची आधी ते खात्री करतात. त्यांच्यासमोर एक रोपटं दिसून येतंय. आजी-आजोबांची नजर त्या रोपावर असते. मोठ्या शिताफीने आजींनी ते रोपटं हळूच चोरलं आणि आपल्या पिशवीत ठेवून दिलं. त्यानंतर हे आजी-आजोबा आपल्या चेहऱ्यावर असे हावभाव आणतात की जणू काही घडलंच नाही. हा व्हिडीओ पाहण्यासाठी फारच मजेदार आहे.

Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच
Bride dance in her own wedding for groom after seeing his groom on stage bride video goes viral on social media
VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल
Bride and groom stand still when national anthem played in wedding ceremony and photoshoot viral video on social media
“जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान

आणखी वाचा : स्विमिंग पूलमध्ये बुडत होती आई, १० वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव, पाहा VIRAL VIDEO

हा मजेदार व्हिडीओ pubity नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीय. “बोनी आणि क्लाइड.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. आजी-आजोबांचं हे कृत्य पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटलं. लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार मांडले आहेत. एका यूजरने लिहिले की, ही जुनी लूट आहे. दुसर्‍या यूजरने कमेंट केलंय की, “इतक्या सहज…, इतकं परफेक्ट”.

आणखी वाचा : फ्लाइट अटेंडंटने रडणाऱ्या लहान मुलाला शांत केलं…बाळाचा गोंडस VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : एका बाईकवर एक पुरूष, दोन महिला आणि चार मुली, एकूण सात जण बसले, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!

हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ९ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ लाख ८५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून व्यक्त होताना दिसत आहेत.

Story img Loader